Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोईन भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवू शकतो : पानेसर

२०१२ च्या दौऱ्यात भारताला पराभूत करण्यात मोलाची भूमिका बजाविणारा इंग्लंडचा फिरकीपटू मोंटी पानेसर याने अनुभवी मोईन अली याला वगळण्याची चूक करू नका, असा सूचक इशारा इंग्लिश व्यवस्थापनाला दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 02:17 IST

Open in App

नवी दिल्ली : २०१२ च्या दौऱ्यात भारताला पराभूत करण्यात मोलाची भूमिका बजाविणारा इंग्लंडचा फिरकीपटू मोंटी पानेसर याने अनुभवी मोईन अली याला वगळण्याची चूक करू नका, असा सूचक इशारा इंग्लिश व्यवस्थापनाला दिला आहे. ५ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत मोईन भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवू शकेल, असे भाकीत मोंटीने केले.चेन्नईतील पहिल्या कसोटीत जॅक लीच याच्यासह मोईनला संधी मिळावी असे मत मांडताना मोंटी म्हणाला, ‘डोम बेस व लीच यांना प्रत्येकी १२ कसोटी खेळण्याचा अनुभव आहे, मात्र दोघेही भारतात सामना खेळलेले नाहीत. मोईन अली श्रीलंका दौऱ्याआधी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने दुर्दैवाने मालिका खेळू शकला नव्हता. भारतीय संघात अनेक उजवे फलंदाज असल्याने लीच संघात असेलच, मात्र बेसऐवजी मोईन याला दुसरा फिरकी गोलंदाज म्हणून संधी मिळायला हवी.अश्विन, पुजारा, रहाणे महत्त्वपूर्ण खेळाडूभारताविरुद्ध मालिकेत इंग्लंड संघासाठी धोकादायक ठरणाऱ्या संभाव्य खेळाडूंमध्ये मोंटी पानेसर याने फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन, भरवाशाचा फलंदाज चेतेश्वर आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांचे नाव घेतले. आश्चर्य असे की धोकादायक खेळाडूंमध्ये मोंटीने विराट कोहली किंवा जसप्रीत बुमराह यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. अजिंक्यची फलंदाजी तसेच नेतृत्व क्षमता यामुळे फारच प्रभावित झाल्याचे मोंटीने म्हटले आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंड