इंग्लंडविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने जबरदस्त कामगिरी केली. ओव्हल कसोटीत त्याने अशा प्रभावी शैलीत गोलंदाजी केली की संपूर्ण सामन्याचे चित्रच बदलून गेले. या सामन्यात त्याने एकूण ९ विकेट्स घेत भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि या कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
ओव्हल कसोटीच्या पहिल्या डावात सिराजने ८६ धावांत ४ विकेट्स तर, दुसऱ्या डावात १०४ धावांत ५ विकेट्स घेतले. अशा प्रकारे त्याने दोन्ही डावांत मिळून ९ फलंदाजांना बाद करत भारताच्या विजयाची पाया रचला. त्याचबरोबर प्रसिद्ध कृष्णानेही ८ विकेट्स मिळवत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
धोनीचा विक्रम मोडला
या कामगिरीसह मोहम्मद सिराजने एक महत्त्वाचा विक्रम आपल्या नावे केला. परदेशात कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. याबाबत त्याने भारताचा एमएस धोनीला मागे टाकले. सिराजचा हा १२ वा परदेशातील कसोटी विजय ठरला. तर, धोनीने खात्यात ११ विजय आहेत. सिराजने आतापर्यंत घराबाहेरील २७ कसोटी सामने खेळले असून त्यापैकी भारताने १२ जिंकले आणि १० गमावले आहेत. शिवाय, ५ सामने अनिर्णित राहिले.
बुमराहच्या विक्रमाशी बरोबरी
यासह सिराजने जसप्रीत बुमराहचीही बरोबरी केली आहे. बुमराहच्या नावावर परदेशात १२ कसोटी विजयांची नोंद आहे. त्यामुळे सिराज आता भारताच्या परदेशातील यशस्वी कसोटीवीरांच्या यादीत अग्रगण्य स्थानी पोहोचला आहे.