IND vs WI, 2nd Test : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिमयवर रंगल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात सिराजला विकेट मिळवण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागली. पहिल्या डावात एकमेव विकेट घेणाऱ्या सिराजनं दुसऱ्या डावात दोन विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. या कामगिरीसह त्याने खास तो यंदाच्या वर्षात कसोटीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानी पोहचला आहे. दुसऱ्या बाजूला जसप्रीत बुमराह मात्र या यादीत आघाडीच्या ५ मध्येही दिसत नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
झिम्बाब्वेच्या गोलंदाजाला धोबीपछाड देत सिराज अव्वलस्थानी
मोहम्मद सिराजनं २०२५ मध्ये आतापर्यंत खेळलेल्या ८ कसोटी सामन्यातील १५ डावात ३७ विकेट्स घेतल्या आहेत. वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यातील कामगिरीसह त्याने झिम्बाब्वेच्या ब्लेसिंग मुजरबानी याला मागे टाकले. मुजरबानी याने या वर्षात ९ सामन्यातील १३ डावात ३६ विकेट्स घेतल्या आहेत.
IND vs WI : जॉन कॅम्पबेलची विक्रमी सेंच्युरी! जे लाराला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
जसप्रीत बुमराह टॉप ५ मधूनही आउट
सिराज आणि मुजरबानी यांच्या पाठोपाठ ऑस्ट्रेलियन मिचेल स्टार्क आणि नॅथन लायन २०२५ मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. याशिवाय वेस्ट इंडिजच्या ताफ्यातील जोमेल वारिकन हा देखील आघाडीच्या पाच गोलंदाजांमध्ये दिसतो. पण बुमराहचं नाव मात्र या यादीत दिसत नाही.
२०२५ मध्ये कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
- मोहम्मद सिराज - ३७
- ब्लेसिंग मुजरबानी - ३६
- मिचेल स्टार्क - २९
- नॅथन लायन - २४
- जोमेल वारिकन- २३
- जसप्रीत बुमराह - २२
- शमर जोसेफ - २२
- जोश टंग - २१