Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती

Asaduddin Owaisi on Siraj, IND vs ENG 5th Test Day 5 Live: ओव्हल कसोटीत टीम इंडियाने जोरदार पुनरागमन केले आणि ६ धावांनी विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 20:10 IST2025-08-04T19:57:11+5:302025-08-04T20:10:35+5:30

whatsapp join usJoin us
mohammed siraj 5 wickets oval test asaduddin owaisi tweets praise india beat england | Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती

Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Siraj, IND vs ENG 5th Test Day 5 Live: भारतीय संघाने इंग्लंड विरूद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत रोमांचक विजय मिळवला. पहिल्या डावात भारताने २२४ तर इंग्लंडने २४७ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताने दुसऱ्या डावात ३९६ धावा करत इंग्लंडला ३७४ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना हॅरी ब्रूक आणि जो रूट यांच्या शतकांमुळे इंग्लंडचा विजय दृष्टीपथात होता. पण शेवटच्या दिवशी इंग्लंडला ३५ धावांची गरज असताना, भारतीय गोलंदाजांनी ४ गडी बाद करत संघाला विजय मिळवून दिला. त्यात ४ पैकी ३ बळी घेत मोहम्मद सिराजने सिंहाचा वाटा उचलला. भारताच्या विजयानंतर खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी खास हैदराबादी शैलीत सिराजचे कौतुक केले.

मोहम्मह सिराजने सामन्याच्या चौथ्या दिवशी एक झेल सोडला होता. त्यानंतर सामन्याला कलाटणी मिळाली होती आणि सामना इंग्लंडच्या बाजून झुकला होता. पण दिवसाचा खेळ संपताना भारताने कमबॅक केले आणि सामना समतोल आणला. आज पाचव्या दिवशी विजयासाठी इंग्लंडला ३५ धावा तर भारताला ४ बळींची गरज होती. त्यावेळी मोक्याच्या क्षणी सिराजने ३ बळी घेत सामना जिंकवला. हैदराबादच्या सिराजचा खासदार ओवेसी यांनी खास शैलीत कौतुक केले. "तू कायमच विजेता आहेत, सिराज. आपल्या हैदराबादी शैलीत म्हणतात ना, पूरा खोल दिए पाशा!" असे ट्विट ओवेसींनी केले.

दरम्यान, पाचव्या दिवसाचा खेळ सुरू होण्याआधी सिराजने काय केले, याबद्दल त्यानेच माहिती दिली. "आम्ही जिंकलोय याचा मला खूप आनंद आहे. कालच्या चुकीनंतर मी आज सकाळी उठलो आणि गुगलवरून Believe म्हणजे स्वत:वर विश्वास ठेवण्याचा फोटो डाऊनलोड केला आणि तो मोबाईलच्या वॉलपेपरवर लावून मनाशी ठरवलं की मी हे नक्कीच करू शकतो. आमचा आमच्या संघावर विश्वास होता. त्यामुळेच आम्ही सामना जिंकलो. आणि त्याचा आम्हा सर्वांना खूप आनंद आहे," असे सिराज म्हणाला.

Web Title: mohammed siraj 5 wickets oval test asaduddin owaisi tweets praise india beat england

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.