Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mohammed Shamiचं नाव का बदनाम करतेस? हसीन जहाँच्या नव्या व्हिडीओवर नेटिझन्स संतापले  

भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहाँ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 10:00 IST

Open in App

भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहाँ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मोहम्मद शमीवर कौटुंबिक अत्याचाराचा आरोप करणाऱ्या हसीन जहाँनं बुधवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात ती एका क्लबमध्ये डान्स करताना दिसत आहे. त्यावर तिनं दुनिया की परवा करे क्यू? असा सवाल विचारला आहे. हसीन जहाँचा हा व्हिडीओ नेटिझन्सना काही आवडला नाही आणि त्यांनी तिला ट्रोल केले.   

हसीन जहाँच्या या व्हिडीओनं काही लोकांना खूप त्रास होताना पाहायला मिळत आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात असे का करतेस? असा सवाल अनेकांनी केला, तर काहींनी तिला अल्लाह से डरो असेही सांगितले. अनेकांनी तर तिला मोहम्मद शमीचं नाव का बदनाम करतेस असा प्रश्न विचारला.  

हसीन जहाँ आणि शमी आता सोबत राहत नाही. 2018मध्ये शमी आणि हसीन यांच्यातील कौटुंबिक वाद न्यायालयात पोहोचला. हसीननं पती शमीवर मॅच फिक्सिंग, कौटुंबिक हिंसाचार आदी अनेक गंभीर आरोप केले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) शमीची चौकशीही केली, परंतु त्याला क्लिन चीट मिळाली. शमीचे अन्य महिलांसोबत संबंध असल्याचा आरोपही हसीननं केला होता.  

मोहम्मद शमी हा चारित्र्यहीन माणूस; हसीननं केलेले गंभीर आरोपशमी हा चारित्र्यहीन माणूस आहे, असा गंभीर आरोप हसीननं केला होता. आपल्या फेसबूक अकाऊंटवरून हसीनने हा आरोप केला होता. हसीन जहाँने आपल्या फेसबूकवरून शमीचा चांगलाच समाचार घेतला होता. यामध्ये हसीन म्हणाली होती की, " शमीने टिक-टॉकचे अकाऊंट उघडले आहे. चारीत्र्यहीन शमी तोकडे कपडे घालणाऱ्या मुलींना फॉलो करतो आहे. शमीच्या अकाऊंटमध्ये 97 व्यक्ती आहेत, ज्यामध्ये 90 मुली आहेत. स्वत: एका मुलीचा बाप असलेला शमी हा अशा वाईट गोष्टी करताना दिसत आहे."  

टॅग्स :मोहम्मद शामीसोशल व्हायरल