Join us

ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...

हसीन जहाँनं पुन्हा साधला शमीवर निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 22:15 IST

Open in App

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी याची एक भावूक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. एका बाजूला त्याची पोस्ट व्हायरल होत असताना दुसऱ्या बाजूला हसीन जहाँं हिने आपल्या मनातील राग काढत शमीवर तो फक्त दिखावा करतोय, असा आरोप केलाय.

हसीन जहाँनं पुन्हा साधला शमीवर निशाणा 

गेल्या अनेक वर्षांपासून हसीन जहाँ आणि मोहम्मद शमी वेगळे राहत आहेत. विभक्त झाले असले तरी अनेकदा हसीन जहाँ  सोशल मीडियाच्या माध्यमातून शमीवर निशाणा साधताना दिसली आहे. आता पुन्हा तोच प्रकार पाहायला मिळाला. पण त्यामागचं नेमकं कारण काय? शमीची कोणती गोष्ट तिला खटकलीये? जाणून घेऊयात त्यामागची  गोष्ट

मोहम्मद शमीची भावूक पोस्ट 

गुरुवारी एका बाजूला हसीन जहाँ हिने आपली लेक आयरा हिचा बर्थडे साजरा केला. दुसरीकडे मोहम्मद शमीनं सोशल मीडियावरुन एक खास पोस्ट शेअर करत लेकीवरील प्रेम व्यक्त केले. जुन्या आठवणीला उजाळा देत क्रिकेटरनं आयराला आयुष्यभर आनंदी राहा.. अशा शुभेच्छा दिल्या. पण हसीन जहाँला त्याची ही पोस्ट खटकली. अन् तिने पुन्हा एकदा शमीवर आरोप केले. 

ना कॉल.. ना गिफ्ट! हसीन जहाँनं पुन्हा केला हा आरोप

हसीन जहाँ हिने लेकीच्या बर्थडे दिवशी शमीवर राग व्यक्त करणारी पोस्ट शेअर केलीये. यात तिने बर्थडे दिवशी ना कॉल करून शुभेच्छा दिल्या ना गिफ्ट दिलं असा उल्लेख करत शमीची पोस्ट ही फक्त दिखावा आहे, असे म्हटलंय.  एवढेच नाही तर कोर्टातील प्रकरणाचा दाखला देत लेकीला सर्व अधिकार मिळवून देईल, असा उल्लेख करत पुन्हा एकदा तिने शमीला अप्रत्यक्षरित्या धमकी दिल्याचे दिसून येते. 

पोटगीच्या स्वरुपात दर महिन्याला ४ लाख देतो शमी

क्रिकेटर मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांनी २०१४ मध्ये एकमेकांसोबत लग्न केले होते. २०१५ मध्ये त्यांना कन्यारत्न झाले. पण त्यांच्या संसारात मिठाचा खडा पडल. २०१८ मध्ये हसीन जहाँनं  शमीवर अनेक गंभीर आरोप केले. तेव्हापासून दोघे वेगवेगळे राहतात. घटस्फोट प्रकरणात कोलकाता उच्च न्यायालयाने शमीला पोटगीसंदर्भातील पत्नी आणि मुलीच्या खर्चासाठी (पोटगी स्वरुपात)  दरमहा  ४ लाख रुपये देण्याचे आदेशही दिले आहेत.

टॅग्स :ऑफ द फिल्डमोहम्मद शामीव्हायरल व्हिडिओव्हायरल फोटोज्