Join us

"बाबा की जय हो, थोडं ज्ञान जपून ठेवा..."; मोहम्मद शमीची संजय मांजरेकरबद्दल खोचक प्रतिक्रिया

Mohammed Shami Sanjay Manjrekar, IPL 2025 Mega Auction: मेगाा लिलावाआधी मोहम्मद शमीने संजय मांजरेकरवर इन्स्टाग्राम स्टोरीतून राग खोचकपणे व्यक्त केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 12:55 IST

Open in App

Mohammed Shami Sanjay Manjrekar, IPL 2025 Mega Auction: आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी दिसणार नाही. दुखापतीमुळे त्याला सध्या टीम इंडियातून बाहेर ठेवण्यात आले आहे. ODI World Cup 2023 च्या फायनलमध्ये त्याने भारतासाठी शेवटचा सामना खेळला. त्यानंतर दुखापतीमुळे शमी IPL 2024 खेळू शकलेला नव्हता. आता IPL 2025 च्या मेगा लिलावाआधी शमीला गुजरात टायटन्स संघाने करारमुक्त केले. त्यामुळे मेगा लिलावात त्याच्यावर मोठी बोली लागेल अशी अपेक्षा आहे. त्याआधी मोहम्मद शमी प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकरवर चांगलाच चिडल्याचे दिसले. त्याने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून आपला राग खोचकपणे व्यक्त केला.

संजय मांजरेकर यांनी मेगालिलावात शमीला अपेक्षित किंमत मिळणार नाही, असे मत व्यक्त केले. शमी सध्या दुखापतग्रस्त असल्याने यंदाच्या IPL लिलावात त्याचा भाव कमी होईल, असे विधान संजय मांजरेकर यांनी केले. यावर शमीने देखील त्याला प्रत्युत्तर दिले. शमीने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. मांजरेकरांचे भाकीत त्याने स्टोरीमध्ये पोस्ट केले. त्यानंतर त्याखाली शमीने लिहिले, "बाबा की जय हो, तुमच्या भविष्यासाठीही थोडेसे ज्ञान जपून ठेवा, तुम्हाला ते उपयोगी पडेल संजय जी. कोणाला भविष्य जाणून घ्यायचे असेल तर सरांना भेटा," अशी खोचक प्रतिक्रिया शमीने दिली.

गुजरात टायटन्स सोडले 

2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये गुजरातने शमीचा समावेश केला होता. 2022 मध्ये शमीने 16 सामन्यात 20 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर पुढच्या सत्रात म्हणजेच आयपीएल 2023 मध्ये शमीने 17 सामन्यात 28 विकेट घेतल्या, त्यानंतर तो मोसमात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. पण त्यानंतर दुखापतीमुळे शमी 2024 चा पुढचा हंगाम खेळू शकला नाही, त्यानंतर फ्रँचायझीने त्याला मेगा लिलावापूर्वी सोडले. 

मोहम्मद शमीची आयपीएल कारकीर्द  

उल्लेखनीय आहे की मोहम्मद शमीने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 110 आयपीएल सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 110 डावांमध्ये गोलंदाजी करताना त्याने 26.86 च्या सरासरीने 127 विकेट्स घेतल्या आहेत. 

टॅग्स :आयपीएल २०२४मोहम्मद शामीआयपीएल लिलाव