Join us

Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...

Ajit Agarkar On Mohammed Shami आयपीएल २०२५ नंतर भारतीय संघ पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 18:38 IST

Open in App

आयपीएल २०२५ नंतर भारतीय संघ पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा करणार आहे. या मालिकेला येत्या २० जून पासून सुरुवात आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली, ज्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीला स्थान मिळाले नाही. यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. यावर भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ताअजित आगरकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

 पत्रकार परिषदेत अजित आगरकरला शमीच्या निवडीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना अजित आगरकर म्हणाले की, "मेडिकल टीमने त्याला अनफीट असल्याचे सांगितले. इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केले. पण गेल्या आठवड्यात त्याला पुन्हा समस्या जाणवल्या. त्यानंतर त्याने एमआरआर केला. इंग्लंड दौऱ्यात शामी काही सामन्यांत उपलब्ध असेल, अशी आशा होती. परंतु, तो वेळत दुखापतीवर मात करू शकला नाही, हे संघासाठी दुर्दैवी आहे. "

शमीची खराब फॉर्मशी झुंजमोहम्मद शमीने जवळजवळ दोन वर्षांपासून भारतासाठी कोणताही कसोटी सामना खेळलेला नाही. त्याने शेवटचा कसोटी सामना २०२३ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात खेळला होता. दुखापतीमुळे जवळजवळ १४ महिन्यांपासून तो भारतीय संघाचा भाग नाही. शमी या वर्षी जानेवारीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला. पण त्याला काही  खास कामगिरी करता आली नाही. आयपीएल यंदाच्या हंगामातही शामीचे प्रदर्शन निराशाजनक ठरले. त्याने नऊ सामन्यात फक्त सहा विकेट्स घेतल्या आहेत.