Join us

'ईदनंतर मोहम्मद शामी भावाच्या मेहुणीसोबत लग्न करतोय'

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी आणि पत्नी हसीन जहाँच्या वादग्रस्त प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2018 12:19 IST

Open in App

नवी दिल्ली - भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी आणि पत्नी हसीन जहाँच्या  वादग्रस्त प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. आतापर्यंत शामीवर त्याची पत्नीगंभीर आरोप केले होते. त्यात आणखी एक भर पडली आहे. मोहम्मद शामी भावाच्या मेहुणींसोबत ईद झाल्यानंतर लग्न करणार आहे आणि याच कारणामुळे शामी मला घटस्फोट देणार आहे, असा खळबळजनक आरोप हसीन जहाँने  केला आहे. 

क्रिक ट्रॅकरने दिलेल्या वृत्तानुसार, मोहम्मद शमी भावाच्या मेव्हणीसोबत लग्न करणार असल्याचा दावा हसीन जहाँने केला आहे. 'ईदनंतर पाच दिवसांनी शमी बोहल्यावर चढणार आहे, आणि णि त्याचमुळे त्याने मला पैशांची ऑफर देत घटस्फोट देण्याची मागणी केली आहे', असा खळबळजनक आरोप हसीनने केले आहेत.

हसीनच्या आरोपांवर  प्रतिक्रिया देताना मोहम्मद शमीने मी दुसरे लग्न करण्यासाठी वेडा झालेलो नाही असे म्हटले आहे. पहिल्या लग्नामुळे माझ्या आयुष्य ढवळून निघाले असून मला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तुम्हाला वाटते की मी वेडा झालोय दुसरा लग्न करायला. हसीनने गेल्या काही महिन्यात केलेले आरोप एकाच क्रमातील आहेत, असे शमी आपल्या स्पष्टीकरणात म्हणाला. तसेच मी दुसरे लग्न केल्यास हसीनला नक्की बोलवेल असेही शमी तिला खिजवण्यासाठी म्हणाला. 

काय आहे प्रकरणहसीन जहाँने आपला पती शामीचे बऱ्याच स्त्रियांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर पाकिस्तानमध्येही त्याची एक प्रेयसी आहे. तिच्याबरोबर त्याने दुबईमध्ये काही काळ व्यतित केला आहे, असा आरोपही हसीनने केला होता. त्यानंतर हसीनने शामीवर मॅच फिक्सींग आणि देशाची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. या आरोपांनंतर कोलकाता पोलिसांनी शामीची चौकशी केली होती.

टॅग्स :मोहम्मद शामीक्रिकेटकरमणूक