Mohammed Shami Lucknow Super Giants LSG Owner Sanjiv Goenka : आयपीएल स्पर्धेत लखनौ सुपर जाएंट्सचा संघ मैदानात उतरतो त्यावेळी स्टेडियमच्या व्हीआयपीए स्टँडमध्ये संघ मालक संजीव गोएंकांची झलक हमखास दिसते. ते प्रत्येक सामन्यात संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात उपस्थितीत असतात. संघाच्या पराभवानंतर त्यांनी कर्णधाराला सुनावल्याचे किस्सेही गाजले. लोकेश राहुलशिवाय IPL च्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या रिषभ पंतलाही त्यांनी सोडले नाही. याच गोष्टीवरून मोहम्मद शमीला नव्या मालकाच्या स्वभावाबद्दल खास प्रश्न विचारण्यात आला होता. यावर लखनौच्या ताफ्यातील टीम इंडियाच्या स्टार गोलंदाजाने अगदी रोखठोक मत मांडले. ५००० रुपयांचा डाव खेळला तरी (गुंतवणूक) जीव खाली वर होता, मग मोठी गुंतवणूक केल्यावर अपेक्षा असणारच असा संदर्भही त्याने यावेळी दिला. दिला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
संघ मालकासंदर्भात काय म्हणाला शमी?
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मोहम्मद शमी हा संजीव गोएंका यांच्या मालकीच्या LSG संघाकडून खेळताना दिसत आहे. त्यामुळेच संघ मालकाच्या कठोर आणि रागीट स्वभावासंदर्भात त्याला प्रश्न विचारण्यात आला होता. यावर भारताच्या स्टार गोलंदाजाने आपल्या संघ मालकाची बाजू घेतली. त्यांच हे वागणं स्वाभाविक आहे, असे सांगताना त्याने संदर्भासह स्पष्टीकरण दिल्याचे पाहायला मिळाले. गोएंका जी यांना क्रिकेटची प्रंचड आवड आहे. ते या खेळाबद्दल नेहमीच उत्सुक असतात. खेळाडूंशीही ते चांगल्या पद्धतीने संवाद साधतात, असे त्याने आपल्याला आलेल्या अनुभावरुन सांगितले.
५००० रुपयांचा डाव लावा मग समजेल!
शुभंकर मिश्रा यांच्यासोबतच्या पॉडकास्टमध्ये शमी म्हणाला की, "मी त्यांना दोन ते तीन वेळा भेटलो आहे. त्यांनी माझ्याशी खूप चांगल्या प्रकारे संवाद साधला. त्यांनी अगदी तर्कशुद्ध आणि टीमबद्दल आवश्यक चर्चा केली. कोणीही व्यक्ती जेव्हा संघासाठी पैसा गुंतवते, तेव्हा अपेक्षा ठेवणे स्वाभाविक आहे. त्यांच्यासंदर्भात सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या मीम्स तयार करुन अनेक चुकीच्या गोष्टी पसरवल्या आहेत. जे अयोग्य वाटते. तुम्ही एखादा सामान्य माणूस घ्या. जर तो ५००० रुपये कुठल्यातरी गोष्टीत गुंतवतो, त्यावेळी तो पैसा बुडू नये, याचा सतत विचार करत असतो. मग एवढी मोठी गुंतवणूक केल्यावर त्यांनाही मोठी अपेक्षा असणे स्वाभाविक आहे, अशा आशयाच्या शब्दांत शमीनं संघ मालकाच्या चर्चित प्रश्नावर रोखठोक उत्तर दिले.