Join us

लॉकडाऊनमध्ये मजूरांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरला मोहम्मद शमी; Video Viral

भारतीय गोलंदाजाच्या समाजकार्याचं होतंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 10:22 IST

Open in App

भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी सध्या त्याच्या पत्नीच्या सोशल मीडियावरील व्हिडीओमुळे चर्चेत आहे. त्याची पत्नी हसीन जहाँ रोज नवीन व्हिडीओ पोस्ट करून शमीवर टीका करत आहे. नुकतंच तिनं शमीसोबतचा न्यूड फोटो पोस्ट करून भारतीय गोलंदाजावर गंभीर आरोप केले. पण, शमी या गोष्टींकडे दुर्लक्ष करून सध्या समाजसेवा करण्यावर भर देताना दिसत आहे. लॉकडाऊनमध्ये मजूरांना मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या शमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लॉकडाऊनच्या काळात मजूरांच्या स्थलांतराचा मुद्दा गंभीर होत चालला आहे. त्यासाठी आता भारतीय रेल्वेनं श्रमिक ट्रेन सुरू केल्या असल्या तरी अनेक मजूर अजूनही पायी घरी जात असल्याचे दिसत आहे. गेल्या महिन्यात असाच पायी जाणारा मजूर शमीच्या घरासमोर चक्कर येऊन पडला होता. शमीनं लगेचच त्याला मदत केली आणि खाण्यासाठी अन्न दिलं. शमीचं घर नॅशनल हायवे पासून जवळच असल्याने रोज हजारो मजदूरांना तेथून पायी जाताना तो पाहतो.

आता शमी या मजूरांसाठी स्वतः रस्त्यावर उतरला आहे. तो स्वतः या मजूरांना राशन आणि फळ वाटत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओनंतर शमीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.  

पाहा व्हिडीओ...

 जगभरात कोरोना रुग्णांची संख्या 63 लाख 70,762 वर पोहोचली आहे. त्यापैकी 29 लाख 04,690 रुग्ण बरे झाले असले तरी 3 लाख 77,515 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 98, 706 वर पोहोचली आहे. सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांमध्ये भारत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. ही चिंतेची बाब आहे. देशातील एकूण रुग्णांपैकी 95,754 रुग्ण बरे झाले आहेत, तर 5608 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :मोहम्मद शामीकोरोना सकारात्मक बातम्या