Join us

Mohammed Shami : मोहम्मद शमी ठरला नेटिझन्सचा ‘बळी’, पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर निराश क्रिकेटप्रेमींची आगपाखड

Mohammed Shami : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शमी महागडा ठरल्याने त्याला नेटिझन्सनी धारेवर धरले. त्याच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 07:47 IST

Open in App

दुबई : विश्वचषक स्पर्धेत पहिल्याच सामन्यात पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागल्याने निराश झालेल्या चाहत्यांनी थेट ‘टीम इंडिया’ला लक्ष्य केले. त्यातही ३.५ षटकांत ४३ धावा देणारा भारताचा गोलंदाज मोहम्मद शमी नेटिझन्सच्या रोषाचा बळी ठरला. मात्र, आजी-माजी क्रिकेटपटूंनी शमीची पाठराखण करत टीकाकारांना संयम राखण्याचे आवाहन केले.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शमी महागडा ठरल्याने त्याला नेटिझन्सनी धारेवर धरले. त्याच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी शमीवर होणारी टीका दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त केले. सेहवागने टीकाकारांकडे दुर्लक्ष करत पुढील सामन्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला शमीला दिला. तर सचिनने शमीला शाब्दिक धीर दिला.

गाेळीबारात १२ जखमीभारताचा पराभव केल्यानंतर पाकिस्तानातील चाहते सैराट झाले. काय करावे आणि काय नकाे, अशी त्यांची अवस्था झाली. हजाराे चाहते रस्त्यावर येऊन जल्लाेष करू लागले. कराची येथे काही चाहत्यांनी हवेत गाेळीबार केला. या जल्लाेषात एका पाेलिसासह १२ जण जखमी झाले. 

टॅग्स :मोहम्मद शामी
Open in App