Mohammad Shami: मोहम्मद शमी... कमबॅकची हमी! रणजी ट्रॉफी सेमीफायनलमध्ये एकाच डावात ८ बळी

Mohammad Shami 8 wickets Ranji Trophy: गेल्या तीन वर्षापासून शमी भारतीय संघात परतण्याची प्रतीक्षा करतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 13:14 IST2026-02-17T13:13:16+5:302026-02-17T13:14:15+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
mohammed shami bags stunning 8 wickets in Ranji Trophy semi final sends loud message To BCCI Selectors | Mohammad Shami: मोहम्मद शमी... कमबॅकची हमी! रणजी ट्रॉफी सेमीफायनलमध्ये एकाच डावात ८ बळी

Mohammad Shami: मोहम्मद शमी... कमबॅकची हमी! रणजी ट्रॉफी सेमीफायनलमध्ये एकाच डावात ८ बळी

Mohammad Shami 8 wickets Ranji Trophy: रणजी ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात मोहम्मद शमीने तुफानी कामगिरी केली. बंगालकडून खेळताना शमीने जम्मू आणि काश्मीर विरुद्ध जबरदस्त स्पेल टाकली. उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करून दाखवली. त्याने पहिल्यांदाच असा कारनामा केला, जो भल्याभल्या गोलंदाजांना युवा असतानाही जमत नाही. प्रथम श्रेणीच्या खेळपट्टीवर खेळताना मोहम्मद शमीने ८ बळी घेत संघाला विजय मिळवून दिला. या दमदार कामगिरीमुळे त्याला टीम इंडियात स्थान मिळण्याची शक्यता बळावली आहे.

शमीच्या धमाकेदार खेळीमुळे बंगालला आघाडी

मोहम्मद शमीच्या विध्वंसक माऱ्यामुळे बंगालने सेमीफायनलच्या पहिल्या डावात जम्मू आणि काश्मीरला मागे टाकले. शमीच्या आठ विकेट्समुळे बंगालने पहिल्या डावात केवळ २६ धावांचीच आघाडी मिळवली. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने जम्मू आणि काश्मीरविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात २२.१ षटके गोलंदाजी केली आणि ९० धावा देत ८ विकेट्स घेतल्या.

निवडकर्त्यांना संदेश

बंगालकडून खेळताना शमीने जम्मू-काश्मीरच्या फलंदाजांना आपल्या स्विंग आणि अचूक टप्प्याने अक्षरशः नामोहरम केले. हे त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील (First-Class Cricket) सर्वोत्तम आकडे आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ नंतर शमीला संघात स्थान मिळाले नव्हते. मात्र, या कामगिरीने त्याने बीसीसीआयच्या (BCCI) निवडकर्त्यांना आपण आगामी मोठ्या मालिकांसाठी पूर्णपणे तंदुरुस्त आणि तयार असल्याचे दाखवून दिले आहे.

कौतुकास्पद स्पेल

शमीने केवळ सुरुवातीचे फलंदाजच नव्हे, तर अर्धशतक झळकावून सेट झालेल्या अब्दुल समद आणि कर्णधार पारस डोग्रा यांनाही बाद करून जम्मू-काश्मीरचा डाव ३०२ धावांत गुंडाळला.

सामन्यावर बंगालचे वर्चस्व

शमीच्या या कामगिरीमुळे बंगालला पहिल्या डावात महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली आहे. बंगालने आपल्या पहिल्या डावात ३२८ धावा केल्या होत्या, ज्यात सुदीप कुमार घरामीने १४६ धावांची शतकी खेळी केली होती.

Web Title : मोहम्मद शमी की वापसी: रणजी ट्रॉफी सेमीफाइनल में 8 विकेट!

Web Summary : रणजी ट्रॉफी सेमीफाइनल में मोहम्मद शमी ने शानदार 8 विकेट लेकर बंगाल को आगे बढ़ाया। जम्मू-कश्मीर के खिलाफ शमी का सर्वश्रेष्ठ प्रदर्शन टीम इंडिया में उनकी वापसी की संभावनाओं को बढ़ाता है।

Web Title : Mohammad Shami's comeback: 8 wickets in Ranji Trophy semi-final!

Web Summary : Mohammad Shami's stunning 8-wicket haul in the Ranji Trophy semi-final propelled Bengal forward. Shami's career-best performance against Jammu & Kashmir has boosted his chances for a Team India recall.