Join us  

T20 World Cup संघातून शुबमन गिल, संजू सॅमसन यांना डच्चू! मोहम्मद कैफने जाहीर केली टीम 

इंडियन प्रीमिअर लीग २०२४नंतर लगेच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 6:15 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीग २०२४नंतर लगेच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अमेरिका व कॅरेबियन बेटांवर होणाऱ्या स्पर्धेत खेळेल हे पक्के आहे, परंतु संघात कोणोकाणाला संधी मिळेल, हे निश्चित नाही. सध्या सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेवर त्यासाठीच निवड समिती लक्ष ठेवून आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतीय संघ जाहीर केला जाणार आहे. पण, त्यासाठी अनेक एक्स्पर्ट आपापली मतं मांडताना दिसत आहेत.

भारताच माजी खेळाडू मोहम्मद कैफने T20 World Cup स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड केली आहे. कैफने त्याच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये फलंदाज, अष्टपैलू आणि गोलंदाजांचा समावेश केला आहे. कैफने विराट कोहलीचाही आपल्या संघात समावेश केला आहे. स्टार स्पोर्ट्सवर बोलताना कैफने हा संघ निवडला आहे आणि त्याने यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा यांना सलामीसाठी ठेवले आहे. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव हे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर खेळतील. त्यानंतर हार्दिक पांड्या येईल.  

कैफने रिषभ पंतचा यष्टिरक्षक म्हणून समावेश केला. अक्षर पटेलला सातव्या क्रमांकावर आणि रवींद्र जडेजाला आठव्या क्रमांकावर कैफच्या संघात आहेत. कुलदीप यादवला फिरकीपटू म्हणून स्थान दिले आहे. रवी बिश्नोईही त्यात असू शकला असता, पण कैफने चायनामॅन गोलंदाजाला प्राधान्य दिले आहे. जसप्रीत बुमराहसह अर्शदीप सिंगचा वेगवान गोलंदाजीत समावेश करण्यात आला आहे.  

मोहम्मद कैफचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा संघ - रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग. 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024भारतीय क्रिकेट संघ