Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोहलीच्या मदतीला धावला कैफ, म्हणाला हे सर्व मुद्दाम केलं जातय

एका चाहत्याच्या कमेंटवर नाराज झालेल्या विराट कोहलीने त्याला देश सोडण्याचा सल्ला दिला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2018 14:01 IST

Open in App
ठळक मुद्देविराट कोहलीच्या विधानाचे मोहम्मद कैफकडून समर्थनकोहलीचे विधान चुकीचा अर्थाने मांडले, कैफ

मुंबई : एका चाहत्याच्या कमेंटवर नाराज झालेल्या विराट कोहलीने त्याला देश सोडण्याचा सल्ला दिला. भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधाराच्या या सल्ल्यावर नेटिझन्स चांगलेच भडकले. त्यांनी कोहलीवर सडकून टीका केली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही ( बीसीसीआय) कोहलीच्या विधानाची गंभीर दखल घेतली. पण, आता त्याच्या समर्थनात माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ उतरला आहे. 

कैफने ट्विट करून कोहलीला समर्थन दर्शवले आणि हे सर्व मुद्दाम केलं जात असल्याचे तो म्हणाला. कोहलीचे विधान चुकीच्या पद्धतीने मांडल्याचा दावाही कैफने केला. त्याला मुद्दाम टार्गेट केलं जात असल्याचे मत कैफने व्यक्त केले. दरम्यान,  भारतीय क्रिकेय नियामक मंडळानेही ( बीसीसीआय) कोहलीचे कान टोचले. भारतीय चाहत्यांमुळेच तुला पगार मिळतो, पैसे कमावतोस, हे विसरू नकोस असे बीसीसीआयने कोहलीला सुनावले.

 

टॅग्स :विराट कोहलीबीसीसीआय