Join us

Eng vs WI, Moeen Ali: 6,6,6,6 ..... दे देणादण!! मोईन अलीने जेसन होल्डरला धू धू धुतलं... पाहा Video

मोईन अलीने एका ओव्हरमध्ये ठोकल्या तब्बल २८ धावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 12:49 IST

Open in App

WI vs Eng T20, Moeen Ali: भारताविरुद्धची मालिका खेळण्यापूर्वी विंडिजचा संघ सध्या इंग्लंडविरुद्ध टी२० मालिका खेळत आहे. शनिवारी खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-२० सामन्यात इंग्लंडचा कर्णधार मोईन अली याने दमदार फलंदाजी करत विरोधी संघाला ठोकून काढलं. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने १९३ धावा केल्या. कर्णधार मोईन अलीने आपल्या डावात २८ चेंडूत ६३ धावा केल्या. त्या संघात त्याने ७ उत्तुंग षटकार ठोकले. जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर त्याने सलग चार षटकार खेचत चाहत्यांचं चांगलंच मनोरंजन केलं.

मोईन अलीने डावाच्या १८ व्या षटकात जेसन होल्डरला लागोपाठ चार षटकार ठोकले. त्याच्या एका षटकात तब्बल २८ धावा कुटल्या. या षटकात २, ६, ६, ६, ६, २ असे सहा चेंडू खेळून काढले. जेसन होल्डरने विंडिजकडून सर्वाधिक विकेट्स घेतल्या. पण मोईन अलीच्या फटकेबाजीमुळे त्याने चार षटकांत ४४ धावा दिल्या. पाहा मोईन अलीच्या फटकेबाजीची व्हिडीओ-

दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत चार सामने खेळले गेले असून त्यापैकी दोन सामने विंडिजने तर दोन इंग्लंडने जिंकले. आता शेवटचा सामना निर्णायक होणार आहे. तसेच या मालिकेनंतर विंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. विंडिजचा संघ भारताविरुद्ध ३ वन डे आणि 3 टी २० सामने खेळणार आहे.

टॅग्स :इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिजइंग्लंडवेस्ट इंडिज
Open in App