Join us  

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 'ओसामा' प्रकरणाचा तपास थांबवला

2015 च्या ॲशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी आपल्याला 'ओसामा' असे संबोधले होते, असा दावा  इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली याने केला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 9:15 AM

Open in App

मेलबर्न : 2015 च्या ॲशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी आपल्याला 'ओसामा' असे संबोधले होते, असा दावा  इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली याने केला होता. अलीच्या या दाव्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली. मात्र, या प्रकरणाचा तपास थांबवत असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी जाहीर केले.

मोइन अलीने त्याच्या आत्मचरित्रात हा दावा केला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियावर क्रिकेट चाहत्यांकडून टीका झाली. कार्डिफ कसोटीत पदार्पणाचा सामना खेळताना प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूकडून आपल्याला 'ओसामा बीन लादेन'  असे संबोधले गेल्याचे अलीने त्यात लिहिले आहे. पण तो खेळाडू कोण हे मात्र जाहीर करण्यात आलेले नाही. 

टॅग्स :आॅस्ट्रेलियाइंग्लंड