Join us

Mitali Raj's Retirement: महिला क्रिकेटला वलयांकित करणाऱ्या मिताली राजचा क्रिकेटला अलविदा

Mitali Raj's Retirement: महिला क्रिकेटला यश, प्रसिद्धी आणि ग्लॅमर मिळवून देणारी मिताली राज ही पहिली क्रिकेटपटू ठरली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 14:43 IST

Open in App

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेटचा पहिला प्रतिथयश चेहरा, म्हणून जिचे नाव घेतले जाते त्या मिताली राजने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. महिला क्रिकेटला यश, प्रसिद्धी आणि ग्लॅमर मिळवून देणारी मिताली राज ही पहिली क्रिकेटपटू ठरली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पण मितालीने आज ट्वेंटी-20 क्रिकेटमधून संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

मितालीने आतापर्यंत 32 आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. भारताकडून 2012 ला श्रीलंका, 2014 ला बांगलादेश आणि 2016 साली भारतात झालेल्या ट्वेंटी-20 विश्वचषकात मितालीने संघाचे नेतृत्व केले होते.

भारताची पहिली ट्वेंटी-20 संघाची कर्णधार, हा बहुमान मितालीने मिळवला होता. मितालीने 88 ट्वेंटी-20 सामन्यांमध्ये 2364 धावा केल्या आहेत. भारताकडून सर्वाधिक ट्वेंटी-20 सामन मितालीच्या नावावर आहेत. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामन्यांमध्ये भारताकडून दोन हाजर धावा करणारी पहिली महिला क्रिकेटपचू ठरली आहे.

आगामी 2021 साली होणाऱ्या विश्वचषकावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी मिताली़ने ट्वेन्टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचे म्हटले जात आहे.

टॅग्स :मिताली राजबीसीसीआय