आयसीसी क्रमवारीत मिताली राज अव्वल पाचमध्ये

२०१७ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताला अंतिम फेरी गाठून देण्यात मितालीचे योगदान मोलाचे ठरले होते

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 08:01 AM2021-06-30T08:01:06+5:302021-06-30T11:15:18+5:30

whatsapp join usJoin us
Mithali Raj in the top five in the ICC rankings | आयसीसी क्रमवारीत मिताली राज अव्वल पाचमध्ये

आयसीसी क्रमवारीत मिताली राज अव्वल पाचमध्ये

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या ताज्या महिला एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीमध्ये भारताची कर्णधार मिताली राज हिने पाचवे स्थान मिळवले आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात केलेल्या ७२ धावांच्या खेळीच्या जोरावर मितालीने पाचवे स्थान काबीज केले.
या सामन्यासह मितालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २२ वर्षे पूर्ण केली.

२०१७ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताला अंतिम फेरी गाठून देण्यात मितालीचे योगदान मोलाचे ठरले होते. नव्या क्रमवारीत तिने तीन स्थानांनी झेप घेत पाचवे स्थान मिळवले. ऑक्टोबर २०१९ सालानंतर मितालीने पुन्हा एकदा अव्वल पाचमध्ये स्थान मिळवले आहे.

Web Title: Mithali Raj in the top five in the ICC rankings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.