Join us

ICC Player Rankings : मिताली राजनं पुन्हा पटकावले अव्वल स्थान, 'नॅशनल क्रश' स्मृती मानधनाचीही भरारी!

भारताच्या महिला संघाची कर्णधार मिताली राज ( Mithali Raj) हिनं आयसीसी महिला वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानावर झेप घेतली आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 14:22 IST

Open in App

भारताच्या महिला संघाची कर्णधार मिताली राज ( Mithali Raj) हिनं आयसीसी महिला वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. वेस्ट इंडिजची स्टेफनी टेलर ( Stafanie Taylor) अव्वल स्थानावरून थेट पाचव्या स्थानी घसरण झाली. ट्वेंटी-20 क्रमवारीत शेफाली वर्मा अव्वल स्थानी कायम आहे आणि स्मृती मानधनानं टॉप थ्रीमध्ये प्रवेश केला आहे. वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यातल्या पाच सामन्यांच्या वन डे मालिकेत विंडीजनं 3-2 असा विजय मिळवला. पण, विंडीज कर्णधार टेलर हिची कामगिरी समाधानकारक झालेली नाही आणि तिचे ३० गुणांचे नुकसान झाले.

मिताली राज ७६२ गुणांसह अव्वल स्थानावर विराजमान झाली आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेची लिझली ली ( ७५८), ऑस्ट्रेलियाची एलिसा हिली ( ७५६) व इंग्लंडची टॅमी बीमोंट ( ७५४) यांचा क्रमांक येतो. स्मृती मानधना ७०१ गुणांसह नवव्या स्थानी कायम आहे.  ट्वेंटी-२० महिला फलंदाजांमध्ये शेफाली ७५९ गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे, तर स्मृतीनं एक स्थानाच्या सुधारणेसह तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

टॅग्स :मिताली राजभारतीय महिला क्रिकेट संघ