भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेसाठी न्यूझीलंडने आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. मिचेल सँटनरकडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. न्यूझीलंडचा संघ वर्ल्ड कप स्पर्धेतील बहुतांश सामने चेन्नईतील चेपॉकच्या मैदानात खेळणार आहे. याच पार्श्वभूमीवर संघ बांधणी करताना फिरकीवर भर देण्याची रणनिती न्यूझीलंडच्या संघाने आखली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
या खेळाडूला पहिल्यांदाचा मिळाली टी-२० वर्ल्ड कप खेळण्याची संधी
न्यूझीलंडच्या संघात जलदगती गोलंदाज जेकब डफी याला देखील स्थान मिळाले आहे. मागील वर्षातील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याने आपली जागा निश्चित केली आहे. तो पहिल्यांदा टी-२० वर्ल्ड कप खेळताना दिसेल. डफीने गतवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं, मात्र अल्पावधीतच आपल्या प्रभावी गोलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सातत्यपूर्ण आपल्या गोलंदाजीतील धार दाखवत त्याने वर्ल्ड कप संघात स्थान मिळवले आहे. टी २० वर्ल्ड कपसाठी न्यूझीलंडच्या संघात वर्णी लागलेल्या या गोलंदाजावर IPLलिलावात RCB च्या संघाने २ कोटी बोली लावली होती.
T20 World Cup 2026: ‘करामती’ खानची टीम ‘डेथ ग्रुप’मध्ये ‘चमत्कार’ दाखवण्यास सज्ज; कुणाला मिळाली संधी?
वर्षात सर्वाधिक विकेट्सचा डाव साधणारा विक्रमवीर ठरला होता डफी
३१ वर्षीय गोलंदाजाने ३६ सामन्यात सर्व प्रकारात मिळून ८१ बळी टिपले आहेत. गतवर्षी डफीनं एका वर्षात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा सर रिचर्ड हेडली या दिग्गजाचा ४० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला होता. आयसीसी टी २० क्रमवारीतल डफी दुसऱ्या स्थानावर आहे. डफीशिवाय न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजीची जबाबदारी लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, अॅडम मिल्न आणि जेम्स नीशम सांभाळतील. तर काइल जेमिसन हा राखीव खेळाडूच्या रुपात संघासोबत असमार आहे.
असा आहे मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखालील टी २० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेसाठी न्यूझीलंडचा संघ
मिचेल सँटनर (कर्णधार), फिन अॅलन, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, डॅरिल मिचेल, अॅडम मिल्ने, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, टिम सिफर्ट, ईश सोढी
ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह: काइल जेमिसन
दुखापती आणि संभाव्य पॅटर्निटी लीव्ह
न्यूझीलंडचे पाच प्रमुख खेळाडू सध्या दुखापतीतून सावरत आहेत, मात्र वर्ल्ड कपपर्यंत ते फिट होण्याची शक्यता आहे.
यामध्ये फिन अॅलन (बोट व हॅमस्ट्रिंग दुखापत), मार्क चॅपमन (घोट्याची दुखापत) , लॉकी फर्ग्युसन (पायाच्या स्नायूंची दुखापत), मॅट हेन्री (पायाच्या स्नायूंची दुखापत), मिचेल सँटनर (जांघेची दुखापत) यांचा समावेश आहे. स्पर्धेदरम्यान लॉकी फर्ग्युसन आणि मॅट हेन्री यांना पॅटर्निटी लीव्ह मिळू शकते.