Mitchell Santner : IPL 2022 Mega Auction आधी महेंद्रसिंग धोनीचा माजी सहकारी पेटला; १३ चेंडूंत ७० धावा चोपून संघाला चषक पटकावून दिला

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी होणाऱ्या मेगा ऑक्शनआधी ( IPL 2022 Mega Auction) दमदार कामगिरी करून आयपीएल फ्रँचायझीचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 03:18 PM2022-01-29T15:18:42+5:302022-01-29T15:20:12+5:30

whatsapp join usJoin us
Mitchell Santner scored 92* from 40 balls including 4 fours and 9 sixes in the Super Smash final, Northern Knights became a champions  | Mitchell Santner : IPL 2022 Mega Auction आधी महेंद्रसिंग धोनीचा माजी सहकारी पेटला; १३ चेंडूंत ७० धावा चोपून संघाला चषक पटकावून दिला

Mitchell Santner : IPL 2022 Mega Auction आधी महेंद्रसिंग धोनीचा माजी सहकारी पेटला; १३ चेंडूंत ७० धावा चोपून संघाला चषक पटकावून दिला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी होणाऱ्या मेगा ऑक्शनआधी ( IPL 2022 Mega Auction) दमदार कामगिरी करून आयपीएल फ्रँचायझीचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. १२ व १३ फेब्रुवारीला बंगळुरू येथे मेगा ऑक्शन होणार आहे. त्याआधी चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) माजी सहकारी व न्यूझीलंडचा फिरकीपटू मिचेल सँटनर ( Mitchell Santner) यानं फलंदाजीत धडाकेबाज कामगिरी करून दाखवली आहे. न्यूझीलंडमधील सुपर स्मॅश ( Super Smash Final) ट्वेंटी-२० लीगच्या अंतिम सामन्यात सँटनरनं फलंदाजीत कमाल दाखवताना संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर नॉर्दर्न डिस्ट्रिक्स ( Northern Districts) संघानं ५६ धावांनी कँटेरबरी ( Canterbury) संघाला नमवून जेतेपद पटकावले.
 


प्रथम फलंदाजी करताना नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट संघानं ५ बाद २१७ धावांचा डोंगर उभा केला. टीम सेईफर्ट, कर्णधार जीत रावल आणि कॉलीन डी ग्रँडहोम एकेरी धावसंख्येवर माघारी परतले असताना कॅटेन क्लार्क व पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मिचेल सँटनरनं संघाचा डाव सावरला. क्लार्क ३४ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकार खेचून ७१ धावांवर माघारी परतला. त्यानंतर सँटनरनं २३० च्या स्ट्राईक रेटनं फटकेबाजी केली. त्यानं ४० चेंडूंत व ९ षटकार खेचताना नाबाद ९२ धावा केल्या. त्यानं अवघ्या १३ चेंडूंत चौकार-षटकारांनी ७० धावा कुटल्या.

प्रत्युत्तरात कँटेरबरी संघ १८.१ षटकांत १६१ धावांवर तंबुत परतला. मॅट हेन्रीनं २२ चेंडूंत ४४ धावांची खेळी केली. टीम साऊदी व इश सोढी यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. सँटनरनेही एक विकेट घेतली.

चेन्नई सुपर किंग्सनं  रवींद्र जडेजा ( 16 कोटी), महेंद्रसिंग धोनी ( 12 कोटी), ऋतुराज गायकवाड( 6 कोटी) , मोईन अली ( 8 कोटी) यांना आयपीएल २०२२ साठी संघात कायम राखले आहे.  

Web Title: Mitchell Santner scored 92* from 40 balls including 4 fours and 9 sixes in the Super Smash final, Northern Knights became a champions 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.