Join us

मिताली राजने प्रशिक्षक रमेश पोवारवर लावले गंभीर आरोप

मितालीने बीसीसीआयचे मुख्य प्रशासकीय अधिकारी राहुल जोहरी आणि क्रिकेट ऑपरेशन्स पाहणारे माजी क्रिकेटपटू साबा करीम यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये मितालीने पोवार आणि डायना यांच्यावर आरोप केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 17:14 IST

Open in App
ठळक मुद्देमहिला ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. या सामन्यात माजी कर्णधार मिताली राजला खेळवण्यात आले नव्हते.आता मितालीने स्पष्टीकरण देताना प्रशिक्षक रमेश पोवारवर गंभीर आरोप लावले आहेत.

नवी दिल्ली : महिला ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. या सामन्यात माजी कर्णधार मिताली राजला खेळवण्यात आले नव्हते. यानंतर मोठा वादंग झाला होता. त्यानंतर आता मितालीने स्पष्टीकरण देताना प्रशिक्षक रमेश पोवारवर गंभीर आरोप लावले आहेत.

मिताली याबाबत म्हणाली की, " वेस्ट इंडिजला पोहोचल्यावर माझ्या आणि पोवार यांच्यामध्ये भांडण झाले होते. त्यावेळी त्यांनी मला अपमानित केले होते. त्याचबरोबर प्रशासकीय समितीमधील माजी कर्णधार डायना एडल्जी यांनी आपल्या पदाचा वापर करत मला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला. "

मितालीने बीसीसीआयचे मुख्य प्रशासकीय अधिकारी राहुल जोहरी आणि क्रिकेट ऑपरेशन्स पाहणारे माजी क्रिकेटपटू साबा करीम यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये मितालीने पोवार आणि डायना यांच्यावर आरोप केले आहेत.

टॅग्स :मिताली राज