ऋषभ पंतच्या कपाळावर किरकोळ प्लास्टिक सर्जरी

पत्रकारांशी बोलताना शर्मा म्हणाले की, त्याची चांगली काळजी घेत आहेत. बीसीसीआयही त्यांच्या संपर्कात आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून, धोका टळलेला आहे. त्याला दिल्लीला हलवायचे की नाही याबाबत अद्याप आम्ही निर्णय घेतलेला नाही. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2023 06:30 IST2023-01-01T06:29:46+5:302023-01-01T06:30:04+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Minor plastic surgery on Rishabh Pant's forehead | ऋषभ पंतच्या कपाळावर किरकोळ प्लास्टिक सर्जरी

ऋषभ पंतच्या कपाळावर किरकोळ प्लास्टिक सर्जरी

डेहराडून : अपघातात जखमी झालेला क्रिकेटपटू ऋषभ पंतवर डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. शनिवारी त्याच्या कपाळावर किरकोळ प्लास्टिक सर्जरी करण्यात आली आहे. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) संचालक श्याम शर्मा यांनी पंत याची विचारपूस केली.
पत्रकारांशी बोलताना शर्मा म्हणाले की, त्याची चांगली काळजी घेत आहेत. बीसीसीआयही त्यांच्या संपर्कात आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून, धोका टळलेला आहे. त्याला दिल्लीला हलवायचे की नाही याबाबत अद्याप आम्ही निर्णय घेतलेला नाही. 
शुक्रवारी पहाटे दिल्ली-डेहराडून महामार्गावर त्याची कार दुभाजकावर आदळली आणि कारने पेट घेतला. ऋषभ आईला भेटण्यासाठी मूळ गावी रुरकी येथे जात होता. त्याच्या डोक्याला, पाठीला व पायाला दुखापत झाली आहे. बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर आणि अनुपम खेर यांनीही पंत याची रुग्णालयात भेट घेतली. 

Web Title: Minor plastic surgery on Rishabh Pant's forehead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.