Join us

आमीरने निवृत्तीची माहिती दिली होती - मिकी आर्थर

कसोटी क्रिकेटला अलविदा करण्याच्या योजनेची त्याने आपल्याला माहिती दिली होती, असे आर्थर यांनी सांगितले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 00:19 IST

Open in App

कराची : पाकिस्तानचे माजी प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर याची बाजू घेतली आहे. कसोटी क्रिकेटला अलविदा करण्याच्या योजनेची त्याने आपल्याला माहिती दिली होती, असे आर्थर यांनी सांगितले.कसोटी क्रिकेटकडे गतवर्षी जुलैमध्ये अचानक पाठ फिरविणाऱ्या आमीरवर चौफेर टीका झालेली. आर्थर म्हणाले, ‘आमीरने मला भविष्यातील योजनेची माहिती दिली होती. मात्र मी त्याला ज्या सामन्यात खेळवू इच्छित होतो, त्या कसोटीवर भर दिला. तिन्ही प्रकारात खेळताना त्याचे शरीर साथ देते का हे मला जाणून घ्यायचे होते.’