Join us  

MI vs SRH: डेव्हिड वॉर्नरच्या विकेटबरोबर SRHनं सामना गमावला, मुंबई इंडियन्सची बाजी

मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) संघ सनरायजर्स हैदराबादविरुद्ध ( Sunrisers Hyderabad) Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आज शारजाह येथे एकमेकांविरुद्ध मैदानावर उतरणार आहेत.

By स्वदेश घाणेकर | Published: October 04, 2020 2:50 PM

Open in App

MI vs SRH Latest News & Live Score : Indian Premier League ( IPL 2020) आज शाहजाह स्टेडियमवर पुन्हा चौकार-षटकारांची आतषबाजी होणे अपेक्षित आहे. मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि सनरायजर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) यांच्यातल्या आजच्या सामन्यात रोहित शर्मानं ( Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भुवनेश्वर कुमार ( Bhuvneshwar Kumar) आजच्या सामन्यात मुकल्यानं SRHला मोठा धक्का बसला आहे. 

MI vs SRH Latest News & Live Score

वॉर्नर बाद झाल्यानं SRHच्या हातून सामना गेला अन् MIनं सहज विजय मिळवला. जसप्रीत बुमराहनं १९व्या षटकात हैदराबादला दोन धक्के दिले. SRHला 7 बाद 174 धावा करता आल्या. मुंबईने 34 धावांनी हा सामना जिंकला. 

SRHवरील दडपण वाढवण्यात मुंबईच्या गोलंदाजांनी यश मिळवलं आणि त्याचा फायदा त्यांना झाला. हैदराबादचा अखेरचा आशास्थान वॉर्नरला बाद करून मुंबईने सामन्यात चुरस निर्माण केली. इशान किशननं शॉर्ट थर्डमॅनवर वॉर्नरचा झेल टिपला. वॉर्नर 44 चेडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ६० धावा करून माघारी परतला.  

दुसऱ्या बाजूने मात्र SRH धक्के बसले. केन विलियम्सन ( 3) धावांवर ट्रेंट बोल्टने बाद केले. त्यामुळे वॉर्नरवरील दडपण वाढत गेले. त्यात प्रियम गर्गनं त्याची विकेट टाकली. १५व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कृणालनं टाकलेला फुलटॉस गर्गनं उत्तुंग टोलावला. पण, सीमारेषेवर राहुल चहरनं तितक्याच चतुराईनं तो टिपला.  

प्रत्युत्तरात डेव्हिड वॉर्नर ( David Warner) आणि जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) यांनी SRH पहिल्या दोन षटकात खोऱ्यानं धावा ओढल्या. पाचव्या षटकात बेअरस्टो ( 25) ला ट्रेंट बोल्टनं बाद केले. त्यानंतर वॉर्नर आणि मनीष पांडे ( Manish Pandey) यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. 

MI vs SRH Latest News : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी IPLमध्ये इतिहास घडवला; असा कोणता विक्रम केला?

हार्दिक पांड्या व किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard) यांनी अखेरच्या षटकात पुन्हा फटकेबाजी केली, परंतु टी नटराजनच्या यॉर्करसमोर त्यांना आणखी फटकेबाजी करता आली नाही. हार्दिक 28 धावांवर त्रिफळाचीत झाला. कृणाल पांड्यानं अखेरच्या चार चेंडूंवर २० धावा चोपून मुंबई इंडियन्सला ५ बाद २०८ धावांपर्यंत मजल मारून दिली. 

इशानवर याचे दडपण आले नाही, त्यानं रशीदनं टाकलेला पुढील चेंडू सीमापार धाडला. हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) ही चेंडू सीमापार पाठवण्याच्या निर्धारानेच आला होता.पण, इशान किशन ३१ धावांवर माघारी परतला. मनीष पांडेने सीमारेषेनजीक त्याचा अप्रतिम झेल टिपला.  

 क्विंटन एका बाजूनं फटकेबाजी करत होता. त्याला फॉर्मात असलेल्या इशान किशनची तोलामोलाची साथ मिळाली. क्विंटननं आपले अर्धशतक पूर्ण करताना संघाला शतकी पल्ला ओलांडून दिला. 14व्या षटकात रशीद खान ( Rashid Khan) क्विंटनला बाद केले. क्विंटन ३९ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकार मारून ६७ धावांवर माघारी परतला. 

मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि सनरायजर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) यांच्यातल्या आजच्या सामन्यात रोहित शर्मानं ( Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भुवनेश्वर कुमार ( Bhuvneshwar Kumar) आजच्या सामन्यात मुकल्यानं SRHला मोठा धक्का बसला.

पण, संदीप शर्मानं ( Sandeep Sharma) त्याची उणीव भासवू दिली नाही. रोहितनं खणखणीत षटकार मारून स्वागत केल्यानंतरही संदीप शर्मानं पुढच्या चेंडूवर MIला धक्का दिला. त्यानं रोहितला यष्टिरक्षक जॉनी बेअरस्टोकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) आणि क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock) यांनी MIचा डाव रुळावर आणला. पण, सिद्धार्थ कौलनं ( Siddarth Kaul) चतुराईनं यादवला माघारी पाठवले. यादवने 18 चेंडूंत 27 धावा केल्या.

मुंबईला पहिल्या पॉवर प्लेमध्ये २ बाद ४८ धावांवर समाधान मानावे लागले. शारजाह स्टेडियमवरील मुंबई इंडियन्सने पहिल्या पॉवर प्लेमध्ये केलेली ही निराशाजनक कामगिरी ठरली. पहिल्यांदा त्यांना पहिल्या ६ षटकांत ५० हून कमी धावांवर समाधान मानावे लागले.   

Mumbai Indians XI: रोहित शर्मा, क्विंटन डी'कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, जेम्स पॅटिन्सन, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह

Sunrisers Hyderabad XI: डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे, केन विलियम्सन, प्रियांक गर्ग, असद समद, एस शर्मा, राशीद खान, सिद्धार्थ कौल, टी नटराजन 

वेदर रिपोर्ट । दिवसाचे तापमान ३७ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता. आर्द्रता असल्याने प्रचंड उकाडा राहील. २३ किमी प्रतिताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

पीच रिपोर्ट । पाटा खेळपट्टी असल्याने साधारणपणे धावांचा पाऊस पडण्याची शक्यता. फलंदाजांवर आवर घालण्यासाठी येथे गोलंदाजांना मोठी कसरत करावी लागते.

मजबूत बाजूमुंबई । कप्तान रोहित शर्माचा शानदार फॉर्म. डेथ ओव्हरमध्ये भेदक गोलंदाजी. ईशान किशन, हार्दिक पांड्या, किरोन पोलार्ड हे मोठे फटके मारण्यात तरबेज.हैदराबाद । सीएसकेवरील विजयाने मनोबल उंचावले. कर्णधार डेव्हिड वॉर्नर, केन विलियम्सन, जॉनी बेयरस्टो, मनीष पांडे हे वादळी फलंदाजी करण्यात सक्षम आहेत.

कमजोर बाजूमुंबई । सलामीवीर क्विंंटन डिकॉक आऊट आॅफ फॉर्म आहे. सूर्यकुमार यादव चांगल्या सुरुवातीनंतरही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला.हैदराबाद । मुख्य वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार जखमी. वेगवान टी. नटराजन खलील अहमद आणि स्टार स्पिनर राशिद खान यांच्यावर दडपण येत असल्याने स्वैर मारा होण्याची शक्यता.

 

 

 

टॅग्स :IPL 2020मुंबई इंडियन्ससनरायझर्स हैदराबाद