Join us  

MI vs SRH Latest News : यॉर्कर किंग टी नटराजन याचा प्रेरणादायी प्रवास; ऐका त्याच्याच तोंडून, Video 

MI vs SRH Latest News & Live Score : Indian Premier League ( IPL 2020) आज शाहजाह स्टेडियमवर पुन्हा चौकार-षटकारांची आतषबाजी होणे अपेक्षित आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: October 04, 2020 4:33 PM

Open in App

MI vs SRH Latest News & Live Score : Indian Premier League ( IPL 2020) आज शाहजाह स्टेडियमवर पुन्हा चौकार-षटकारांची आतषबाजी होणे अपेक्षित आहे. मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि सनरायजर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) यांच्यातल्या आजच्या सामन्यात रोहित शर्मानं ( Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात SRHला भुवनेश्वर कुमारच्या अनुभवाची उणीव जाणवत असली तरी त्यांच्याकडे यॉर्कर किंग टी नटराजन आहे. चेन्नईच्या एका लहानशा गावातून आलेल्या या खेळाडूनं अथक परिश्रमाच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण केली.

आई चिकन विकायची आणि वडील साडी तयार करण्याच्या कंपनीत कामाला होते. तीन बहिणी आणि तो असा हा परिवार. टी नटराजन याचा सनरायझर्स हैदराबादपर्यंतचा प्रवास आज सर्वांसमोर स्वतः त्यानेच उलगडला. SRHनं त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यात नटराजनचा प्रवास ऐकून अनेकांना प्रेरणा नक्की मिळाली असेल. 2017मध्ये किंग्ल इलेव्हन पंजाबनं त्याला ३ कोटींत आपल्या ताफ्यात घेतले. परंतु तीन वर्षांत त्याच्या वाट्याला सहाच सामने आले. २०१८मध्ये हैदराबादनं त्याला आपल्या संघात घेतले.

पाहा त्याचा प्रवास  

 
टॅग्स :IPL 2020सनरायझर्स हैदराबादमुंबई इंडियन्स