Join us  

MI vs SRH Latest News : कृणाल पांड्याच्या २० धावा ठरल्या विक्रमी; दिग्गज फलंदाजांनाही असे जमले नाही, video

MI vs SRH Latest News & Live Score : Indian Premier League ( IPL 2020) आज शाहजाह स्टेडियमवर पुन्हा चौकार-षटकारांची आतषबाजी झाली.

By स्वदेश घाणेकर | Published: October 04, 2020 6:01 PM

Open in App

MI vs SRH Latest News & Live Score : Indian Premier League ( IPL 2020) आज शाहजाह स्टेडियमवर पुन्हा चौकार-षटकारांची आतषबाजी झाली. मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि सनरायजर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) यांच्यातल्या सामन्यात रोहित शर्मानं ( Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतल्यानं MIचे चाहते निराश झाले. क्विंटन डी कॉकने फटकेबाजी करून ती निराशा दूर करण्याचा प्रयत्न केला आणि हार्दिक पांड्या व किरॉन पोलार्ड यांनी अखेरच्या षटकांत धावा चोपल्या. पण, मुंबईच्या चाहत्यांना अपेक्षित असलेली धावसंख्या उभारण्यात MI अपयशी ठरला.  MI vs SRH Latest News & Live Score

MI vs SRH Latest News : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी IPLमध्ये इतिहास घडवला; असा कोणता विक्रम केला?

भुवनेश्वर कुमार ( Bhuvneshwar Kumar) आजच्या सामन्यात मुकल्यानं SRHला मोठा धक्का बसला. पण, संदीप शर्मानं ( Sandeep Sharma) त्याची उणीव भासवू दिली नाही. रोहितनं खणखणीत षटकार मारून स्वागत केल्यानंतरही संदीप शर्मानं पुढच्या चेंडूवर MIला धक्का दिला. त्यानं रोहितला यष्टिरक्षक जॉनी बेअरस्टोकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) आणि क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock) यांनी MIचा डाव रुळावर आणला. पण, सिद्धार्थ कौलनं ( Siddarth Kaul) चतुराईनं यादवला माघारी पाठवले. यादवने 18 चेंडूंत 27 धावा केल्या. MI vs SRH Latest News & Live Score

क्विंटन एका बाजूनं फटकेबाजी करत होता. त्याला फॉर्मात असलेल्या इशान किशनची तोलामोलाची साथ मिळाली.   क्विंटन ३९ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकार मारून ६७ धावांवर माघारी परतला. इशान किशन ३१ धावांवर माघारी परतला. मनीष पांडेने सीमारेषेनजीक त्याचा अप्रतिम झेल टिपला. हार्दिक पांड्या व किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard) यांनी अखेरच्या षटकात पुन्हा फटकेबाजी केली, परंतु टी नटराजनच्या यॉर्करसमोर त्यांना आणखी फटकेबाजी करता आली नाही. हार्दिक 28 धावांवर त्रिफळाचीत झाला. कृणाल पांड्यानं अखेरच्या चार चेंडूंवर २० धावा चोपून मुंबई इंडियन्सला ५ बाद २०८ धावांपर्यंत मजल मारून दिली.

IPL मध्ये एका डावात ५००च्या स्ट्राईक रेटनं ( किमान १० धावा/३ चेंडूंत) धावा करणारा कृणाल पांड्या हा पहिलाच खेळाडू ठरला. 

पाहा व्हिडीओ...

कृणाल पांड्या वि. सनरायजर्स हैदराबाद 4 चेंडूंत 20* धावा, 500.00 स्ट्राईक रेट, 2020दीपक हुडा वि. किंग्स इलेव्हन पंजाब 3 चेंडूंत 14* धावा, 466.67 स्ट्राईक रेट, 2019लक्ष्मीरतन शुक्ला वि. डेक्कन चार्जर्स 3 चेंडूंत 14* धावा, 466.67 स्ट्राईक रेट, 2008नमन ओझा वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स 3 चेंडूंत 13* धावा, 433.33 स्ट्राईक रेट, 2014जोफ्रा आर्चर वि. किंग्स इलेव्हन पंजाब 3 चेंडूंत 13* धावा, 433.33 स्ट्राईक रेट, 2020क्रेग व्हाईट वि. डेक्कन चार्जर्स 3 चेंडूंत 13* धावा, 433.33 स्ट्राईक रेट, 2010

टॅग्स :IPL 2020क्रुणाल पांड्यामुंबई इंडियन्सक्विन्टन डि कॉकसनरायझर्स हैदराबाद