Join us  

MI vs SRH Latest News : मुंबई इंडियन्सला अपेक्षित पल्ला गाठण्यात अपयश, SRHच्या गोलंदाजांचं कौतुक

MI vs SRH Latest News & Live Score : Indian Premier League ( IPL 2020) आज शाहजाह स्टेडियमवर पुन्हा चौकार-षटकारांची आतषबाजी होणे अपेक्षित आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: October 04, 2020 5:13 PM

Open in App

MI vs SRH Latest News & Live Score : Indian Premier League ( IPL 2020) आज शाहजाह स्टेडियमवर पुन्हा चौकार-षटकारांची आतषबाजी होणे अपेक्षित आहे. मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि सनरायजर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) यांच्यातल्या आजच्या सामन्यात रोहित शर्मानं ( Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतल्यानं MIचे चाहते निराश झाले. क्विंटन डी कॉकने फटकेबाजी करून ती निराशा दूर करण्याचा प्रयत्न केला आणि हार्दिक पांड्या व किरॉन पोलार्ड यांनी अखेरच्या षटकांत धावा चोपल्या. पण, मुंबईच्या चाहत्यांना अपेक्षित असलेली धावसंख्या उभारण्यात MI अपयशी ठरला. MI vs SRH Latest News & Live Score

भुवनेश्वर कुमार ( Bhuvneshwar Kumar) आजच्या सामन्यात मुकल्यानं SRHला मोठा धक्का बसला. पण, संदीप शर्मानं ( Sandeep Sharma) त्याची उणीव भासवू दिली नाही. रोहितनं खणखणीत षटकार मारून स्वागत केल्यानंतरही संदीप शर्मानं पुढच्या चेंडूवर MIला धक्का दिला. त्यानं रोहितला यष्टिरक्षक जॉनी बेअरस्टोकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) आणि क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock) यांनी MIचा डाव रुळावर आणला. पण, सिद्धार्थ कौलनं ( Siddarth Kaul) चतुराईनं यादवला माघारी पाठवले. यादवने 18 चेंडूंत 27 धावा केल्या. MI vs SRH Latest News & Live Score

मुंबईला पहिल्या पॉवर प्लेमध्ये २ बाद ४८ धावांवर समाधान मानावे लागले. शारजाह स्टेडियमवरील मुंबई इंडियन्सने पहिल्या पॉवर प्लेमध्ये केलेली ही निराशाजनक कामगिरी ठरली. पहिल्यांदा त्यांना पहिल्या ६ षटकांत ५० हून कमी धावांवर समाधान मानावे लागले. क्विंटन एका बाजूनं फटकेबाजी करत होता. त्याला फॉर्मात असलेल्या इशान किशनची तोलामोलाची साथ मिळाली. क्विंटननं आपले अर्धशतक पूर्ण करताना संघाला शतकी पल्ला ओलांडून दिला. 14व्या षटकात रशीद खान ( Rashid Khan) क्विंटनला बाद केले. क्विंटन ३९ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकार मारून ६७ धावांवर माघारी परतला. MI vs SRH Latest News & Live Score

इशानवर याचे दडपण आले नाही, त्यानं रशीदनं टाकलेला पुढील चेंडू सीमापार धाडला. हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) ही चेंडू सीमापार पाठवण्याच्या निर्धारानेच आला होता.पण, इशान किशन ३१ धावांवर माघारी परतला. मनीष पांडेने सीमारेषेनजीक त्याचा अप्रतिम झेल टिपला. हार्दिक पांड्या व किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard) यांनी अखेरच्या षटकात पुन्हा फटकेबाजी केली, परंतु टी नटराजनच्या यॉर्करसमोर त्यांना आणखी फटकेबाजी करता आली नाही. हार्दिक 28 धावांवर त्रिफळाचीत झाला. कृणाल पांड्यानं अखेरच्या चार चेंडूंवर २० धावा चोपून मुंबई इंडियन्सला ५ बाद २०८ धावांपर्यंत मजल मारून दिली.

 

टॅग्स :IPL 2020मुंबई इंडियन्ससनरायझर्स हैदराबादरोहित शर्माहार्दिक पांड्याक्रुणाल पांड्या