Join us  

MI vs RR : बेन स्टोक्स-संजू सॅमसन यांची फटकेबाजी, मुंबई इंडियन्सचा लाजीरवाणा पराभव

MI vs RR Latest News & Live Score: चेन्नई सुपर किंग्सचा अडथळा मार्गातून दूर केल्यानंतर राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) त्यांचे स्पर्धेतील आव्हान वाचवण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians) तगड्या आव्हानाचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: October 25, 2020 6:13 PM

Open in App

MI vs RR Latest News :  १९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सचा ( Rajasthan Royals) संघ बलाढ्य मुंबई इंडियन्ससमोर ( Mumbai Indians) गुडघे टेकेल असाच सर्वांचा अंदाज होता. पण, निराशाजनक सुरुवातीनंतरही बेन स्टोक्स आणि संजू सॅमसन यांनी तुफान फटकेबाजी करून RRला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. आतापर्यंत MIचे गोलंदाज हे यंदाच्या Indian Premier League ( IPL 2020) सर्वात तगडे मानले जात होते, परंतु आज त्यांना RRच्या या दोन फलंदाजांनी जमिनीवर आणले. राजस्थान रॉयल्सनं हा सामना ८ विकेट राखून जिंकला. बेन स्टोक्सनं शतकी खेळी केली.

MI vs RR Latest News & Live Score:

स्टोक्स-सॅमसननं नाबाद १५२ धावांची भागीदारी करून राजस्थानला १८.२ षटकांत २ बाद १९६ धावा करून विजय मिळवून दिला. स्टोक्सन ६० चेंडूंत १४ चौकार व ३ षटकारांसह १०७ धावांवर, तर सॅमसन ३१ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५४ धावांवर नाबाद राहिला.  

प्रत्युत्तरात रॉबिन उथप्पा ( १३) दुसऱ्याच षटकात माघारी परतला. कर्णधार स्टीव्हन स्मिथ ( ११)चा जेम्स पॅटिन्सननं त्रिफळा उडवला. बेन स्टोक्सनं एका बाजूनं फटकेबाजी करताना राजस्थानच्या आशा कायम राखल्या होत्या. स्टोक्सनं २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. संजू सॅमसननं त्याला तोलामोलाची साथ दिली. दोघांनी ६३ चेंडूंत शतकी भागीदारी करताना धावा व चेंडू यांतील अंतर कमी केलं. या दोघांसमोर मुंबई इंडियन्सचे गोलंदाज अपयशी ठरताना दिसत होते. संजू सॅमसननं २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. 

बेन स्टोक्सनं एका बाजूनं फटकेबाजी करताना राजस्थानच्या आशा कायम राखल्या होत्या. स्टोक्सनं २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.  

प्रत्युत्तरात रॉबिन उथप्पा ( १३) दुसऱ्याच षटकात माघारी परतला. कर्णधार स्टीव्हन स्मिथ ( ११)चा जेम्स पॅटिन्सननं त्रिफळा उडवला. 

मुंबई इंडियन्सनं अखेरच्या पाच षटकांत १ विकेटच्या मोबदल्यात ७९ धावा केल्या. 

हार्दिक पांड्यानं २० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. कार्तिक त्यागीनं टाकलेल्या २०व्या षटकात हार्दिकनं २७ धावा कुटल्या. हार्दिक २१ चेंडूंत २ चौकार व ७ षटकारांसह ६० धावांवर नाबाद राहिला. मुंबई इंडियन्सनं ५ बाद १९५ धावा चोपल्या.

फॉर्मात असलेला क्विंटन डी'कॉक ( ६) पहिल्याच षटकात माघारी परतला. जोफ्रा आर्चरनं त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर इशान किशन व सूर्यकुमार यादव यांनी मुंबई इंडियन्सचा डाव सावरला. या दोघांची ८३ धावांची भागीदारी कार्तिक त्यागीनं संपुष्टात आणली. इशान किशन ३७ धावांवर माघारी परतला. जोफ्रा आर्चरनं बाऊंड्री लाईनवर त्याचा अफलातून झेल घेतला. त्यानंतर श्रेयस गोपाळानं MI ला दोन धक्के दिले. यादव २६ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ४० धावांवर, तर किरॉन पोलार्ड ६ धावांवर माघारी परतला. पण, हार्दिक पांड्या व सौरभ तिवारी यांनी राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना धु धु धुतले. त्यांनी ३१ चेंडूंत ६४ धावांची भागीदारी केली. अंकित राजपूतच्या एका षटकात हार्दिकनं सलग तीन षटकारांसह २७ धावा चोपल्या. ३४ धावा करणाऱ्या सौरभला आर्चरनं बाद केले. 

राजस्थान रॉयल्स - रॉबिन उथप्पा, बेन स्टोक्स, संजू सॅमसन, स्टीव्हन स्मिथ, जोस बटलर, रियान पराग, राहुल टेवाटिया, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाळ, अंकित राजपूत, कार्तिक त्यागी 

मुंबई इंडियन्स - क्विंटन डी कॉक, इशान किशन, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, किरॉन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, जेम्स पॅटिसन्सन, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह 

मुंबई इंडियन्सच्या संघात एक बदल - नॅथन कोल्टर-नायलच्या जागी जेम्स पॅटिन्सनला संधी

टॅग्स :IPL 2020मुंबई इंडियन्सराजस्थान रॉयल्स