MI vs RR Latest News & Live Score: चेन्नई सुपर किंग्सचा अडथळा मार्गातून दूर केल्यानंतर राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) त्यांचे स्पर्धेतील आव्हान वाचवण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians) तगड्या आव्हानाचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरले आहेत.. मुंबई इंडियन्सला आजच्या सामन्यात रोहित शर्माच्या सेवेला मुकावे लागले. किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात झालेल्या दुखापतीनंतर तो विश्रांतीवर आहे. कर्णधार किरॉन पोलार्डनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. 
फॉर्मात असलेला क्विंटन डी'कॉक ( ६) पहिल्याच षटकात माघारी परतला. 
जोफ्रा आर्चरनं त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर इशान किशन व सूर्यकुमार यादव यांनी मुंबई इंडियन्सचा डाव सावरला. या दोघांची ८३ धावांची भागीदारी कार्तिक त्यागीनं संपुष्टात आणली. इशान किशन ३७ धावांवर माघारी परतला. 
जोफ्रा आर्चरनं बाऊंड्री लाईनवर त्याचा अफलातून झेल घेतला.
पाहा व्हिडीओ...
राजस्थान रॉयल्स - रॉबिन उथप्पा, बेन स्टोक्स, संजू सॅमसन, स्टीव्हन स्मिथ, जोस बटलर, रियान पराग, राहुल टेवाटिया, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाळ, अंकित राजपूत, कार्तिक त्यागी 
मुंबई इंडियन्स - क्विंटन डी कॉक, इशान किशन, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, किरॉन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, जेम्स पॅटिसन्सन, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह 
मुंबई इंडियन्सच्या संघात एक बदल - नॅथन कोल्टर-नायलच्या जागी जेम्स पॅटिन्सनला संधी