Join us

MI vs RR Latest News : रोहित शर्माची दुखापत गंभीर? आजच्या सामन्यातही खेळणार नाही

Indian Premier League ( IPL 2020) आजच्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) हे संघ भिडणार आहेत.

By स्वदेश घाणेकर | Updated: October 25, 2020 16:32 IST

Open in App

Indian Premier League ( IPL 2020) आजच्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) हे संघ भिडणार आहेत. मुंबई इंडियन्सIPL 2020मधील प्ले ऑफच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत, तर राजस्थान रॉयल्सला उर्वरित सर्व सामने जिंकूनही अन्य संघांच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागणार आहे. पण, या सामन्यापूर्वी MIची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. ANIनं दिलेल्या वृत्तानुसार कर्णधार रोहित शर्मा आजच्या सामन्यालाही मुकणार आहे. किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्याच्या मांडीचे स्नायू ताणले गेले होते. त्यानंतर त्यानं चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात विश्रांती घेतली होती.

MIचे संघव्यवस्थापन रोहितला आजच्या सामन्यातही विश्रांती देण्याच्या तयारीत आहेत आणि बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) विरुद्ध रोहित पुन्हा मैदानावर उतरवणार आहे. आगामी ऑस्ट्रेलिया दौराही लक्षात घेता मॅनेजमेंट रोहितवर अधिक ताण देऊ इच्छित नाही. रोहितची दुखापत गंभीर नसली तरी मॅनेजमेंट कोणताही धोका पत्करू इच्छित नाही.  चेन्नईविरुद्धच्या सामन्यापूर्वी मॅनेजमेंटनं सांगितलं होतं की, ''मागील सामन्यात रोहित शर्माच्या डाव्या मांडीचे स्नायू दुखावले गेले. मागील चार दिवसांपासून रोहितच्या फिटनेसमध्ये सुधारणा होत आहे. पण, आजच्या सामन्यात त्याला विश्रांती देण्याचा सल्ला संघ व्यवस्थापनानं घेतला आहे.''   

टॅग्स :IPL 2020राजस्थान रॉयल्समुंबई इंडियन्सरोहित शर्मा