Join us  

MI vs RCB Latest News : Super विजय; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं गमावलेला सामना जिंकला

अखेरच्या षटकापर्यंत सामन्यातील चुरस कायम होती. पाचव्या चेंडूवर इशान किशनची पडलेली विकेट सामन्याला कलाटणी देतो की काय असे वाटत होते, परंतु पोलार्डनं अखेरच्या चेंडूवर चौकार खेचून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला.

By स्वदेश घाणेकर | Published: September 28, 2020 11:40 PM

Open in App

MI vs RCB Latest News : Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आज मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यात चुरशीचा सामना पाहायला मिळाला. 15व्या षटकापर्यंत RCBच्या हातात असलेला सामना किरॉन पोलार्डनं ( Kieron Pollard) अलगद MIच्या बाजूने झुकवला. इशान किशनच्या ( Ishan Kishan) परिपक्व खेळाला पोलार्डच्या अनुभवाची साथ लाभली आणि मुंबई विजयाच्या उंबरठ्यावर आले होते. अखेरच्या षटकापर्यंत सामन्यातील चुरस कायम होती. पाचव्या चेंडूवर इशान किशनची पडलेली विकेट सामन्याला कलाटणी देतो की काय असे वाटत होते, परंतु पोलार्डनं अखेरच्या चेंडूवर चौकार खेचून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. नवदीन सैनीनं ( Navdeep Saini) टिच्चून मारा करताना MI ला 1 बाद 7 धावा करू दिल्या. त्यानंतर RCBनं बाजी मारली.

आरोन फिंच ( Aaron Finch) आणि देवदत्त पडीक्कल ( Devdutt Padikkal) यांनी सावध सुरुवात केली. 9व्या षठकात ट्रेंट बोल्टनं RCBला पहिला धक्का दिला. फिंच 35 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकारासह 52 धावा केल्या.  14व्या षटकात देवदत्त पडीक्कलने MIचा गोलंदाज जेम्स पॅटिसन्स ( James Pattinson ) याला सलग दोन षटकार खेचून RCBला शतकी पल्ला पार करून दिला.  पडीक्कल 40 चेंडूंत 54 धावांवर माघारी परतला. त्यानंतर डिव्हिलियर्सनं 24 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकारासह नाबाद 55, तर शिवम दुबेनं 10 चेंडूंत 1 चौकार व 3 षटकारासह नाबाद 27 धावा केल्या.  RCBनं 20 षटकांत 3 बाद 201 धावांचा डोंगर उभा केला.   लक्ष्याचा पाठलाग करताना  MI ला पहिल्या दहा षटकांत 3 बाद 63 धावाच करता आल्या. हार्दिक पांड्याकडून ( Hardik Pandya) मोठ्या खेळीची अपेक्षा होती, परंतु अॅडम झम्पानं ( Adam Zampa) त्याला 15 धावांवर माघारी पाठवले.  MIला अखेरच्या 5 षटकांत विजयासाठी 90 धावांची गरज होती. 17व्या षटकात पवन नेगीनं सीमारेषेवर पोलार्डचा झेल सोडला आणि तो RCBला भारी पडेल असेच चिन्ह दिसू लागली होती. अॅडम झम्पानं टाकलेल्या 18व्या षटकात पोलार्डनं 4, 6, 6, 2, 6, 3 अशा 27 धावा चोपल्या. अखेरच्या चेंडूवर युजवेंद्र चहलनं पोलार्डचा झेल सोडला.  पोलार्डचा हा झंझावात पुढीत षटकात कायम राहिला. युजवेंद्रचे त्यानं खणखणीत षटकारानं स्वागत केलं. 18व्या षटकात पोलार्डनं 6, 2, 1, 6 (इशान किशन), 1, 6 अशा 22 धावा चोपल्या. या षटकासह पोलार्डनं 20 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.  त्यामुळे अखेरच्या 12 चेंडूंत मुंबईला 31 धावा हव्या होत्या. नवदीप सैनीनं 19व्या षटकात पहिल्या चार चेंडूंत पाच धावा दिल्या, परंतु इशाननं पाचव्या चेंडूवर षटकार खेचला. यासह इशान व पोलार्ड यांनी शतकी भागीदारी पूर्ण केली. मुंबईला 6 चेंडूंत 19 धावा हव्या होत्या. पहिल्या दोन चेंडूंवर प्रत्येकी एक धाव आल्यानंतर इशाननं तिसऱ्या चेंडूवर षटकार खेचला. चौथ्या चेंडूवरही त्याचीच पुनरावृत्ती केली. पण, पाचव्या चेंडूवर इशान सीमारेषेवर झेलबाद झाला. इशान 58 चेंडूंत 2 चौकार व 9 षटकार खेचून 99 धावांवर माघारी परतला. पोलार्डनं अखेरच्या चेंडूवर विजयासाठी 5 धावा हव्या असताना चौकार खेचला व सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. MI ने 5 बाद 201 धावा केल्या. 

सुपर ओव्हरचा थरारनवदीप सैनी गोलंदाजीला/ हार्दिक पांड्या व किरॉन पोलार्ड फलंदाजीलापहिला चेंडू - 1 धाव ( पोलार्ड)दुसरा चेंडू - 1 धाव ( हार्दिक)तिसरा चेंडू - 0 धाव ( पोलार्ड)चौथा चेंडू - चौकार ( पोलार्ड)पाचवा चेंडू - OUT ( पोलार्ड ) सहावा चेंडू - 1 बाय धावा ( हार्दिक) 

जसप्रीत बुमराह गोलंदाजी/ एबी डिव्हिलियर्स व विराट कोहली फलंदाजीलापहिला चेंडू - 1 धाव ( एबी) दुसरा चेंडू - 1 धाव ( विराट) तिसरा चेंडू - o धाव ( एबी) चौथा चेंडू - चौकार ( एबी) पाचवा चेंडू - 1 धाव ( एबी)सहावा चेंडू - चौकार ( विराट) 

टॅग्स :IPL 2020मुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर