Join us  

MI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान

आरोन फिंच ( Aaron Finch) आणि देवदत्त पडीक्कल ( Devdutt Padikkal) यांनी सावध सुरुवात केली. दोघांनी वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले.

By स्वदेश घाणेकर | Published: September 28, 2020 9:03 PM

Open in App

MI vs RCB Latest News : Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आज मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यातला संघर्ष पाहायला मिळणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली ( Virat Kohli) या दोन स्टार खेळाडूंचा खेळही या सामन्यात पाहायला मिळणार असल्यानं सर्वच उत्सुक आहेत. मुंबई इंडियन्सनं ( MI) मागच्या सामन्यात KKRवर विजय मिळवला होता, तर RCBला किंग्स इलेव्हन पंजाबकडून ( KXIP) दारूण पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे त्यांचा नेट रन रेट वजा झाला आहे. दोन्ही संघांनी दोन सामन्यांत एका विजयासह खात्यात 2 गुण जमा केले आहेत. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. MI vs RCB Latest News & Live Score :

आरोन फिंच ( Aaron Finch) आणि देवदत्त पडीक्कल ( Devdutt Padikkal) यांनी सावध सुरुवात केली. दुसऱ्या व तिसऱ्या षटकात फिंचला अनुक्रमे कृणाल पांड्या व रोहित शर्मा यांनी जीवदान दिले. कृणालसाठी झेल थोडासा अवघड होता, परंतु ट्रेंट बोल्टनं टाकलेल्या तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मिडविकेटला रोहित शर्मानं फिंचचा झेल सोडला. फिंच तेव्हा अवघ्या 10 धावांवर होता. राहुल चहरनं पाचवं षटक टाकलं आणि फिंचनं त्यावर 14 धावा कुटल्या. RCBनं पहिल्या पॉवर प्लेमध्ये बिनबाद 59 धावा केल्या. फिंचनं 31 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. 9व्या षठकात ट्रेंट बोल्टनं RCBला पहिला धक्का दिला. फिंच 35 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकारासह 52 धावा केल्या. 10व्या षटकात कृणाल पांड्यानं ( Krunal Pandya) एक अजब चेंडू टाकला. त्यानं केदार जाधव, लसिथ मलिंगा यांच्यासह स्वतःची शैली मिश्रित करून 10व्या षटकाचा पाचवा चेंडू फेकला.MI vs RCB Latest News & Live Score : विराट कोहलीचा अपयशाचा पाढा याही सामन्यात कायम राहिला. राहुल चहरच्या गुगलीवर विराट ( 3) रोहित शर्माच्या हाती सोपा झेल देऊन माघारी परतला. 14व्या षटकात देवदत्त पडीक्कलने MIचा गोलंदाज जेम्स पॅटिसन्स ( James Pattinson ) याला सलग दोन षटकार खेचून RCBला शतकी पल्ला पार करून दिला. देवदत्तनं 16व्या षटकात किरॉन पोलार्डला खणखणीत चौकार मारून अर्धशतक पूर्ण केले. 37 चेंडूंत त्यानं हे अर्धशतक पूर्ण केलं. तिसऱ्या सामन्यातील त्याचे हे दुसरे अर्धशतक ठरले. AB de Villiersने आजच्या सामन्यात IPL मधील 4500 धावांचा पल्ला पार करण्याचा विक्रम नावावर केला.

IPL मध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडूविराट कोहली ( Virat Kohli) - 179 सामने, 5427 धावासुरेश रैना ( Suresh Raina) - 193 सामने, 5368 धावारोहित शर्मा ( Rohit Sharma) - 190 सामने, 4990 धावाडेव्हिड वॉर्नर ( David Warner) - 128 सामने, 4748 धावाशिखर धवन ( Shikhar Dhawan) - 161 सामने, 4614 धावाएबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers ) - 157 सामने, 4511* 

 

टॅग्स :IPL 2020एबी डिव्हिलियर्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमुंबई इंडियन्स