Join us  

उत्साह शिगेला! RCBने टॉस जिंकला; रोहितने सांगितला प्लॅन; आर्चर बुमराहची कमी भरून काढणार?

MI vs RCB IPL 2023 T20 Cricket Match Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या पर्वातील पाचवा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2023 7:13 PM

Open in App

MI Vs RCB 2023 Live Score । बंगळुरू : इंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या पर्वातील पाचवा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जात आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सचा संघ मागील वर्षी निराशाजनक खेळी विसरून मैदानात उतरला आहे. तर फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वात आरसीबीचा संघ आयपीएलच्या जेतेपदाचा दुष्काळ मिटवण्याच्या इराद्याने उतरला आहे. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत मुंबईच्या गोलंदाजीची धुरा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या खांद्यावर आहे. आपल्या सलामीच्या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. खेळपट्टी चांगली दिसत आहे, आम्हाला फक्त इराद्याने फलंदाजी करायची आहे, असे रोहित शर्माने यावेळी सांगितले. 

दरम्यान, आरसीबीच्या संघाने मागील हंगामात पात्रता फेरी गाठली होती. पण संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्सचा क्वालिफायर २ मध्ये पराभव झाला अन् आरसीबीचे आव्हान संपुष्टात आले. मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असला तरी संघाला मागील वर्षी सलग ८ पराभव स्वीकारावे लागले होते. 

मुंबई इंडियन्सचे विदेशी खेळाडू - टिम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, जोफ्रा आर्चर आणि जेसन बेहरेनडॉर्फ.

आरसीबीचे विदेशी खेळाडू - फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, मायकेल ब्रेसवेल आणि रीस टोपले. आजच्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ - रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, कॅमेरून ग्रीन, टिळक वर्मा, डेव्हिड, नेहल वढेरा, शोकीन, चावला, जोफ्रा आर्चर आणि अर्शद खान.

आजच्या सामन्यासाठी आरसीबीचा संघ - फाफ डू प्लेसिस, विराट कोहली, मायकेल ब्रेसव्हेल, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज, दिनेश कार्तिक, हर्षल पटले, टोपली, आकाश दीप, कर्ण आणि मोहम्मद सिराज.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"  

टॅग्स :मुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोररोहित शर्माजोफ्रा आर्चरविराट कोहली
Open in App