Join us  

MI vs KKR Latest News : किरॉन पोलार्डला सामन्यापूर्वी MIने दिली भेट; त्याने तसा विक्रमच नोंदवलाय

MI vs KKR Latest News : कोलकाता नाइट रायडर्सने ( KKR) नाणेफेक जिंकून  मुंबई इंडियन्सला ( MI) प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले.

By स्वदेश घाणेकर | Published: September 23, 2020 7:41 PM

Open in App

MI vs KKR Latest News : गतविजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) हा Indian Premier League ( IPL 2020) च्या जेतेपदाच्या शर्यतीत सुरूवातीपासून आघाडीवर होता. तगड्या फलंदाजांची फौज, सर्वोत्तम अष्टपैलू आणि भेदक मारा करणाऱ्या गोलंदाजांचा तोफखाना असलेला MI पहिल्याच सामन्यात पराभूत झाला. त्यामुळे कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) विरुद्धच्या आजच्या सामन्यात सर्वांचे लक्ष त्यांच्या विजयाकडे लागले आहेत. KKR विरुद्ध मागील पाच सामन्यातं MIने चार विजय मिळवले आहेत. (MI vs KKR Latest News & Live Score)

कोलकाता नाइट रायडर्सने ( KKR) नाणेफेक जिंकून  मुंबई इंडियन्सला ( MI) प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. सलग पाचव्या सामन्यात नाणेफेक जिंकणाऱ्या संघाचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय. मात्र आधीच्या चार सामन्यांपैकी तीन सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या  संघानेच जिंकला आहे.  या सामन्यात मुंबईचा अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डला ( Kieron Pollard ) सामन्यापूर्वी 150 क्रमांकाची जर्सी देण्यात आली. पण का? (MI vs KKR Latest News & Live Score)

Mumbai Indinas : रोहित शर्मा, क्विंटन डी'कॉक, सुर्यकूमार यादव, सौरभ तिवारी, किरॉन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांPlaying XIड्या, राहुल चहर, जेम्स पॅटिन्सन, ट्रेंट बोल्ड, जसप्रीत बुमराह

Kolkata Knight Riders Playing XI: सुनील नरीन, नितीश राणा, इयॉन मॉर्गन, आंद्रे रसेल, दीनेश कार्तिक, एन नाईक, पॅट कमिन्स, कुलदीप यादव, एस वॉरियर्स, एस मावी, शुबमन गिल

मुंबई इंडियन्सकडून 150वा आयपीएल सामना खेळणारा पोलार्ड हा पहिलाच खेळाडू आहे. पोलार्डनं 150 IPL सामन्यांत 2773 धावा केल्या आहेत. त्यात 14 अर्धशतकांचा समावेश असून 83 ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. शिवाय पोलार्डने 56 विकेट्सही घेतल्या आहेत. 

कॅरेबियन प्रीमिअर गाजवून IPLसाठी दाखलत्रिनबागो नाइट रायडर्सनं ( Trinbago Knight Riders) CPL 2020 चे जेतेपद पटकावले. पोलार्डच्या नेतृत्वाखाली त्याने ही कामगिरी केली. पोलार्डनं  CPL 2020त 51.75 च्या सरासरी अन् 204.95च्या स्ट्राइक रेटनं 207 धावा चोपल्या. यात त्याच्या 28 चेंडूंत 72 धावांच्या वादळी खेळीचाही समावेश आहे. 12 सामन्यांत त्यानं 20 षटकार खेचले, शिवाय 8 विकेट्स घेतल्या. अंतिम सामन्यात 30 धावांत त्यानं 4 विकेट्स घेऊन विजयात सिंहाचा वाटा उचलला.

पोलार्डचे 150 सामने 2020- 22019- 162018- 92017- 172016- 132015- 162014- 152013- 182012- 142011- 162010- 14

Out is Out!, MS Dhoniच्या बचावासाठी साक्षीची बॅटिंग, तिसऱ्या अम्पायरवर टीका

 महेंद्रसिंग धोनीची खिलाडूवृत्ती हरवलीय? त्याने जे केलं त्याचं समर्थन करावं का?  

IPL 2020 : CSKला धक्का; ड्वेन ब्राव्होनंतर आणखी एक मॅच विनर पुढील सामन्यांना मुकणार?

टॅग्स :IPL 2020मुंबई इंडियन्सकोलकाता नाईट रायडर्स