Join us  

MI vs DD, IPL 2018 Live Score: मुंबईचे आव्हान संपुष्टात, शेवटच्या लढतीत दिल्लीकडून 11 धावांनी पराभव

गतविजेत्या मुंबई इंडियन्सचे आयपीएलमधील आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले आहे. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या लढतीत मुंबईला दिल्लीकडून 11 धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे मुंबईचे प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याचे स्वप्न भंगले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2018 3:38 PM

Open in App

 नवी दिल्ली - गतविजेत्या मुंबई इंडियन्सचे आयपीएलमधील आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले आहे. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या लढतीत मुंबईला दिल्लीकडून 11 धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे मुंबईचे प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याचे स्वप्न भंगले आहे. 175 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना एर्विन लुईसने मुंबईला दमदार सुरुवात करून दिली होती. मात्र लुईस (48) बाद झाल्यानंतर मुंबईच्या डावाला गळती लागली. कर्णधार रोहित शर्मानेही निराशा केली. हार्दिक पांड्या (27) आणि बेन कटिंग (37) यांनी झुंजार खेळ करत मुंबईला विजय मिळवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही.  

8.02PM - मुंबईचा संपूर्ण संघ 163 धावांत गारद, दिल्ली डेअरडेव्हिल्सचा 11 धावांनी विजय 

7.58 PM - शेवटच्या षटकात मुंबईला 18 धावांची गरज

7.57 PM - मुंबईला आठवा धक्का, मयांक मार्कंडे बाद 

7.30PM -  हार्दिक पांड्या 27 धावांवर बाद, मुंबईला सातवा धक्का

7.25PM - कर्णधार रोहित शर्मा 13 धावा काढून बाद, मुंबईला सहावा धक्का 

7.02 PM - कृणाल पांड्याही माघारी, मुंबईचा निम्मा संघ तंबूत 

6.59PM -  पोलार्ड बाद, मुंबईला चौथ्था धक्का 

6.56PM - मुंबईला तिसरा धक्का, इव्हिन लुईस 48 धावांवर बाद 

6.40 PM -  मुंबईला दुसरा धक्का, अमित मिश्राने इशान किशनला धाडले माघारी 

6.30PM - मुंबई इंडियन्सच्या पहिल्या 5 षटकांतच 50 धावा पूर्ण 

6.11PM - मुंबई इंडियन्सला पहिला धक्का, सूर्यकुमार यादव 12 धावा काढून बाद 

 

रिषभ पंतचे अर्धशतक, दिल्लीचे मुंबईसमोर 175 धावांचे आव्हान नवी दिल्ली -  शेवटच्या साखळी सामन्यात विजय मिळवून आयपीएलच्या क्वालिफायर फेरीसाठी पात्र ठरण्यासाठी मुंबई इंडियन्ससमोर 175 धावांचे आव्हान आहे. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या रिषभ पंतने केलेली दमदार अर्धशतकी खेळी आणि शेवटच्या षटकांमध्ये विजय शंकरने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 4 बाद 174 धावा फटकावल्या. चांगल्या सुरुवातीनंतर पृथ्वी शॉ (12) आणि ग्लेन मॅक्सवेल (22) हे सलामीवीर व कर्णधार श्रेयस अय्यर (6) हे झटपट बाद झाल्याने दिल्लीचा डाव अडचणीत आला होता. मात्र रिषभ पंतने फटकावलेल्या 64 धावा आणि विजय शंकरच्या नाबाद 43 धावांच्या जोरावर दिल्लीने समाधानकारक धावसंख्या उभारली. 

LIVE UPDATES :

5.53PM - दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या 20 षटकांत 4  बाद 174 धावा, मुंबईसमोर विजयासाठी 175 धावांचे आव्हान  

5.33PM - रिषभ पंत 64 धावा काढून बाद, दिल्लीला चौथा धक्का

05.21PM - रिषभ पंतचे अर्धशतक पूर्ण

04.44PM - कर्णधार श्रेयस अय्यर बाद, दिल्लीला तिसरा धक्का 

04.35PM - सात षटकांनंतर दिल्लीच्या दोन बाद 60 धावा, कर्णधार श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत मैदानात

04.21PM - दिल्लीला दुसरा धक्का, बुमराहने उडवला मॅक्सवेलचा त्रिफळा

04.15PM - दिल्ली डेअरडेव्हिल्सला पहिला धक्का, पृथ्वी शॉ 12 धावा काढून धावचीत

04.12PM - दिल्लीची दमदार सुरुवात, पहिल्या 3  षटकांत फटकावल्या 30 धावा

03.32PM - दिल्ली डेअरडेव्हिल्सने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय 

 

 

नवी दिल्ली : मुसंडी मारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबई इंडियन्सपुढे आज रविवारी आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध ‘करा किंवा मरा’ या निर्धारासह विजय मिळविण्याचे आव्हान असेल. प्ले आॅफमध्ये धडक देण्यास मुंबई संघ आतूर आहे. मुंबई इंडियन्सची निव्वळ धावगती +0384 आहे. पण तरीही विजयासह ही धावगती उत्तम राखण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असेल. गेल्या काही सामन्यांमधील मुंबई इंडियन्सची कामगिरी पाहता रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील हा गतविजेता संघ बाद फेरीत निश्चित स्थान मिळवू शकेल. दिल्ली संघ आधीच शर्यतीबाहेर पडला; पण काल चेन्नईवर ३४ धावांनी मिळविलेल्या विजयानंतर त्यांच्या युवा खेळाडूंमध्ये आत्मविश्वास संचारला. हे युवा खेळाडू रोहित अ‍ॅन्ड कंपनीसाठी धोकादायक ठरू शकतात. 

 

टॅग्स :आयपीएल 2018मुंबई इंडियन्सदिल्ली डेअरडेव्हिल्सरोहित शर्मा