Join us  

MI vs DC : क्विंटन डी'कॉक, सूर्यकुमार यादव यांनी मिळवून दिला मुंबईला विजय

MI vs DC Latest News & Live Score : क्विंटन डी' कॉक आणि सूर्यकुमार यादव यांनी दिल्लीच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. मुंबईनं विजयासह गुणतक्त्यात अव्वल स्थान पटकावलं. 

By स्वदेश घाणेकर | Published: October 11, 2020 6:22 PM

Open in App

MI vs DC Latest News: इंडियन प्रीमियर लीगच्या ( Indian Premier League) १३व्या पर्वात  सातत्य राखणारे मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) संघांदरम्यान आज चुरशीची लढत होण्याची अपेक्षा आहे. दिल्लीच्या संघात असलेले मुंबईकर पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे अपयशी ठरल्यानंतर शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांनी MIच्या गोलंदाजांचा सामना केला. गब्बरनं अर्धशतकी खेळी करताना दिल्लीला समाधानकारक पल्ला गाठून दिला. पण, मुंबई इंडियन्सची ( MI) घोडदौड रोखण्यासाठी पुरेसा ठरला नाही. क्विंटन डी' कॉक आणि सूर्यकुमार यादव यांनी दिल्लीच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. मुंबईनं विजयासह गुणतक्त्यात अव्वल स्थान पटकावलं. 

MI vs DC Latest News & Live Score : 

किरॉन पोलार्ड आणि इशान किशन यांनी मुंबईला विजय मिळवून दिला. इशान १५ चेंडूंत २ चौकार व २ षटकार खेचून २८ धावांवर माघारी परतला. मुंबई इंडियन्सनं हा सामना ५ विकेट्स राखून जिंकला. विजयासाठी अखेरच्या षटकात ७ धावांची गरज असताना कृणाल पांड्यानं पहिल्याच चेंडूवर चौकार खेचला. दुसऱ्या चेंडूवर पृथ्वी शॉनं रन आऊटची संधी सोडली. 

यादव आणि इशान शर्मा यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. कागिसो रबाडानं १५व्या षटकात मुंबईला धक्का दिला. यादव ३२ चेंडूंत ६ चौकार व १ षटकार खेचून ५३ धावांत माघारी परतला. बर्थ डे बॉय हार्दिक पांड्या भोपळा न फोडताच मार्कस स्टॉयनिसच्या गोलंदाजीवर माघारी परतला.  

प्रत्युत्तरात रोहित शर्मा ( ५) लगेच माघारी परतला तरी क्विंटन डी'कॉक आणि सूर्यकुमार यादव यांनी दिल्लीच्या गोलंदाजांना धु धु धुतले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४६ धावा जोडल्या. आर अश्विननं ही भागीदारी तोडली. क्विंटन ३६ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५३ धावांवर माघारी परतला. क्विंटन बाद होण्यापूर्वी आधीच्या चेंडूवर अश्विननं यादवचा सोपा झेल सोडला होता. 

धवनने ५२ चेंडूंत १ षटकार व ६ चौकारांसह नाबाद ६९ धावा केल्या. दिल्लीनं २० षटकांत ४ बाद १६२ धावा केल्या. 

धवननं ३९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. धवनचे हे IPLमधील ३८वे अर्धशतक ठरले आणि त्यानं सुरेश रैना, रोहित शर्मा व विराट कोहली ( प्रत्येकी ३८ अर्धशतकं ) यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.  

शिखर धवन आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी दिल्लीचा डाव सावरला. यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी केली. कृणाल पांड्यानं दिल्लीला आणखी एक धक्का देत अय्यरला ( ४२) बाद केले.  

दिल्ली कॅपिटल्सकडून अजिंक्य रहाणेचे पदार्पण अन् नोंदवला मोठा विक्रम

दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीनं अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) व अॅलेक्स केरी यांना स्थान दिले. प्रथम फलंदाजीला आलेल्या दिल्लीला साजेशी सुरुवात करता आली नाही. ट्रेंट बोल्टनं तिसऱ्याच चेंडूवर पृथ्वी शॉ ( ४) याला बाद केले. त्यानंतर अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane)  खेळपट्टीवर आला. त्याने काही सुरेख फटके मारताना क्लास दाखवला, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही.

रहाणेला पाचव्या षटकात कृणाल पांड्यानं १५ धावांवर पायचीत केलं. त्यानंतर शिखऱ धवननं दोन विक्रम केले. IPLमध्ये त्यानं शंभर षटकार खेचले आणि दिल्लीकडून १००० धावा पूर्ण केल्या. अजिंक्यनेही खास विक्रम केला. ट्वेंटी-20त त्यानं ५००० धावांचा पल्ला ओलांडला. अशी कामगिरी करणारा तो दहावा भारतीय फलंदाज ठरला.  

SRH vs RR Latest News : राहुल टेवाटिया-रियान परागनं राजस्थान रॉयल्सला मिळवून दिला अशक्यप्राय विजय

- किरॉन पोलार्डनंतर रोहित शर्मानं नोंदवला विक्रम

 मुंबईचा सामना करण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सची खेळाडूंना भेट; सर्वांच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू, Video 

आकडेवारी काय सांगतेHead to head:एकूण सामने २४, मुंबई इंडियन्स १२ जिंकले, दिल्ली कॅपिटल्स १२ जिंकलेअबु धाबीतील कामगिरीमुंबई इंडियन्सनं ५ पैकी ३ सामने जिंकले २ पराभूतदिल्ली कॅपिट्सनं २ पैकी २ सामने पराभूत 

आज कोणते विक्रम मोडणार?- रोहित शर्मानं ६१ धावा केल्यास मुंबई इंडियन्सकडून तो ४००० धावांचा पल्ला पार करेल- ट्रेंट बोल्टला IPLमध्ये विकेट्सचे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी २ बळींची गरज आहे- क्विंटन डी'कॉकने तीन बळी टिपल्यास IPLमध्ये तो ५० बळी पूर्ण करेल- हार्दिक पांड्याला झेलचे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी दोन झेल घ्यावे लागतील-  रिषभ पंत व शिखर धवन यांना IPLमध्ये षटकारांचे शतक पूर्ण करण्यासाठी १ उत्तुंग फटका मारावा लागेल- शिखर धवनने ७ धावा करताच दिल्ली कॅपिटल्सकडून १००० धावा पूर्ण करेल  

मजबूत बाजूमुंबई । रोहित शर्मासह ईशान किशन, हार्दिक पांड्या, किरोन पोलार्ड शानदार फॉर्मात. गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह व ट्रेंट बोल्ट यांचा अनुभव उपयुक्त ठरेल.दिल्ली । पृथ्वी शॉ, ऋषभ पंत व कर्णधार श्रेयस अय्यर यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा.

कमजोर बाजूमुंबई । रोहित अपयशी ठरला तर मधल्या फळीवर अतिरिक्त दडपण येण्याची शक्यतादिल्ली । वेगवान गोलंदाजांच्या अपयशामुळे अश्विनवर अतिरिक्त दडपण येण्याची शक्यता.

टॅग्स :IPL 2020मुंबई इंडियन्सदिल्ली कॅपिटल्स