Join us

MI vs DC: मुंबईनं सामना जिंकला अन् मालकीण निता अंबानी यांनी प्रेक्षकांचे मन! पाहा फोटो

IPL 2025: दिल्लीविरुद्ध सामन्यात विजय मिळवून मुंबईच्या संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 16:20 IST

Open in App

भारतात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांनी त्यांच्या संघातील खेळाडूंना कोविड रोखण्यासाठी नियमांचे पालन करण्यास सांगितले. दिल्लीविरुद्ध सामन्यात विजय मिळवून मुंबईच्या संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला. या सामन्यानंतर निता अंबानी यांनी त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी आलेला संघाचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराहचे हात सॅनिटाइज केले, ज्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबई- दिल्ली यांच्यातील सामन्यानंतर नीता अंबानी यांनी जसप्रीत बुमराहला हस्तांदोलन करण्याआधी हाताला सॅनिटायझर लावण्यास सांगितले. यानंतर एमआय लेग-स्पिनर कर्ण शर्मालाही सॅनिटायझर दिले. नीता अंबानी बुमराहचे हात सॅनिटायझरने स्वच्छ करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. संघाचा अष्टपैलू खेळाडू दीपक चहरही हातात सॅनिटायझर घेऊन फिरत होता. दीपक चहर मुंबई आणि दिल्लीच्या खेळाडूंना सॅनिटायझर देताना दिसला.

भारतातील अनेक भागांमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली. विशेषतः केरळ, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या देशात २५० हून अधिक सक्रिय कोरोना बाधित रुग्ण आहेत. सनरायझर्स हैदराबादचा ऑस्ट्रेलियन सलामीवीर फलंदाज ट्रॅव्हिस हेड कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर एकही सामना खेळू शकला नाही.

मुंबईचा प्लेऑफमध्ये प्रवेशसूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांच्या दमदार खेळीच्या जोरावर मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा ५९ धावांनी पराभव करून प्लेऑफमध्ये स्थान मिळाले. या सामन्यात सूर्यकुमार यादवने नाबाद ७३ धावा केल्या. नमन धीरनेही चांगली खेळी. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने १८० धावा केल्या. त्यानंतर दिल्लीचा संघ १२१ धावांवर ऑलआऊट झाला.  

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५