Join us  

MI vs CSK Latest News : रोहित शर्मा दुखापतग्रस्त? किरॉन पोलार्ड सांभाळणार मुंबईचे नेतृत्व

Indian Premier League ( IPL 2020) मधील प्ले ऑफच्या शर्यतीतील आव्हान टीकवण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) आता पुढील प्रत्येक सामना जिंकणे गरजेचे आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: October 23, 2020 4:09 PM

Open in App

Indian Premier League ( IPL 2020) मधील प्ले ऑफच्या शर्यतीतील आव्हान टीकवण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) आता पुढील प्रत्येक सामना जिंकणे गरजेचे आहे. आज त्यांच्यासमोर तगड्या मुंबई इंडियन्सचे ( Mumbai Indians) आव्हान आहे. सलामीच्या सामन्यात CSKनं MIवर विजय मिळवला होता आणि आता परतीच्या सामन्यात त्याची परतफेड करण्यासाठी MI सज्ज आहे. पण, त्यांची चिंता वाढवणारे वृत्त समोर येत आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) दुखापतीमुळे आजच्या सामन्यात मुकणार असल्याचे वृत्त मिळत आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard) संघाचे नेतृत्व सांभाळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

किंग्स इलेव्हन पंजाब ( KXIP) विरुद्धच्या सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशनला रोहित आला नव्हता. त्यावेळी तो आजारी असल्याचे पोलार्डनं  सांगितलं होतं. पण, तो चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या लढतीपूर्वी बरा होईल, असेही सांगण्यात आले होते. मात्र, दी न्यू इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार रोहितच्या मांडीचे स्नायू ताणले गेले आहेत आणि आजच्या सामन्यात तो विश्रांती करणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. याबाबत अजूनही मुंबई इंडियन्सकडून कोणतिही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. CSKविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक होईल, तेव्हा चित्र स्पष्ट होईल.

मजबूत बाजू -चेन्नई - युवा खेळाडूंना संधी दिली तर विजयाची शक्यता वाढेल.

मुंबई - संघ शानदार फॉर्मात. गोलंदाजी आक्रमणामध्ये विविधता. क्विंटन डिकॉक, सूर्यकुमार यादव व ईशान किशन यांची शानदार कामगिरी. पोलार्ड व हार्दिक पांड्या आक्रमक फलंदाजी करण्यास सक्षम. लेग स्पिनर राहुल चाहलची भेदक गोलंदाजी.

कमकुवत बाजू -चेन्नई - आता ड्वेन ब्राव्होची सेवा मिळणार नाही. फाफ ड्युप्लेसिसचा अपवाद वगळता अन्य फलंदाज फॉर्मात नाही. संघामध्ये वेगाने धावा फटकावण्याच्या क्षमतेचा अभाव दिसत आहे.

मुंबई - रोहित शर्मा मोठी खेळी करण्यात अपयशी. नाथन कुल्टर नाईट गेल्या लढतीत महागडा ठरला.

आमने सामनेसामने - 29विजय - मुंबई -  17चेन्नई - 12अनिर्णित - 0 

टॅग्स :IPL 2020रोहित शर्मामुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्स