Join us  

MI vs CSK Latest News : चेन्नई सुपर किंग्सचे फलंदाज ढेपाळले अन् पडला मीम्सचा पाऊस!

MI vs CSK Latest News: Indian Premier League ( IPL 2020) च्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्सची ( Chennai Super Kings) इतकी वाईट अवस्था कदाचित कधी झाली असावी.

By स्वदेश घाणेकर | Published: October 24, 2020 8:00 AM

Open in App

MI vs CSK Latest News: Indian Premier League ( IPL 2020) च्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्सची ( Chennai Super Kings) इतकी वाईट अवस्था कदाचित कधी झाली असावी. इंडियन प्रीमिअर लीगच्या इतिहासात प्रथमच चेन्नई सुपर किंग्सला प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयश आले. यापूर्वी आयपीएलच्या प्रत्येक मोसमात चेन्नईनं प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. मुंबई इंडियन्सनं आज १० विकेट्स राखून विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान निश्चित केले.  

करो वा मरो सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) शेन वॉटसनला बाकावर बसवण्याचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड आणि नटराजन जगदीसन यांना आजच्या सामन्यात संधी दिली. पण, त्यांना या संधीचं सोनं करता आलं नाही. ऋतुराज ( ०), अंबाती रायूडू  ( २) व नटराजन  ( ०) सलग दोन चेंडूवर माघारी परतले. फॅफ ड्यू प्लेसिसला ( १) बाद करून CSKला मोठ्या अडचणीत आणले. रवींद्र जडेजाही माघारी परतला अन् चेन्नईचा निम्मा संघ २१ धावांवर माघारी परतला. जसप्रीत बुमराह ( २/२५), राहुल चहर ( २/२२) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. नॅथन कोल्टर नायलनं एक विकेट घेतली. ट्रेंट बोल्टनं सर्वाधिक ( ४/१८) विकेट्स घेतल्या. सॅम कुरननं ४७ चेंडूंत ५२ धावा केल्या आणि त्या जोरावर चेन्नईला ९ बाद ११४ धावा करता आल्या. कुरननं फिरकीपटू इम्रान ताहीरसोबत ९व्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी केली. 

प्रत्युत्तरात इशान किशन आणि क्विंटन डी'कॉक यांनी दमदार खेळ करताना मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिला. या दोघांनी चेन्नईच्या गोलंदाजांना कोणतीच संधी दिली नाही. इशान किशन ३७ चेंडूंत ६ चौकार व ५ षटकारांसह ६८ धावांवर नाबाद राहीला. क्विंटन डी'कॉकनं ३७ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह नाबाद ४६ धावा केल्या. मुंबई इंडियन्सनं दहा विकेट्स राखून विजय मिळवताना चेन्नई सुपर किंग्सचे Play Offमध्ये प्रवेश करण्याच्या स्वप्नांना सुरुंग लावला. 

चेन्नई सुपर किंग्सच्या अपयशानंतर सोशल मीडियावर मात्र मीम्सचा पाऊस पडला...

 

टॅग्स :IPL 2020चेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्स