Join us

#MeToo: मोहम्मद शमीला एक न्याय अन् राहुल जोहरींना दुसरा, बीसीसीआयला घरचा आहेर

#MeToo: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्यावर एका महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 16:56 IST

Open in App

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्यावर एका महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. या साऱ्या प्रकरणामुळे बीसीसीआयच्या नावाला बट्टा लागला आहे. या मीटू प्रकरणानंतर बीसीसीआय जोहरी यांच्याविरोधात कठोर कारवाई करतील अशी अपेक्षा होती, परंतु त्यादृष्टीने अजून काहीच हालचाल झालेली नाही. मात्र, जोहरींविरोधात आठ संलग्न संघटनांनी मोट बांधून बीसीसीआयला घरचा आहेर दिला आहे. 

जोहरी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करणारे पत्र त्यांनी बीसीसीआयला पाठवले आहे. भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद शमी याच्यावर पत्नीने छळाचा आरोप करताच बीसीसीआयने त्याला त्वरित निलंबित केले होते. तशी तत्परता जोहरी यांच्याबाबतीत का दाखवण्यात येत नाही, असा सवालही या संघटनांनी केला आहे. प्रशासकिय समितीने जोहरी प्रकरणाचा तपास करण्यासाठी तीन सदस्यांची समिती नेमली आहे. मात्र, हरयाणा क्रिकेट असोशिएशनने जोहरींना निलंबित का करण्यात आले नाही, असा सवाल प्रशासकिय समितीला केला आहे.

त्याचवेळी हरयाणा क्रिकेट असोसिएशनने मोहम्मद शमीच्या बाबतित घडलेल्या प्रकरणाची आठवण करून दिली. पत्नीच्या आरोपानंतर शमीला त्वरित निलंबित करण्यात आले होते, मग जोहरींवर कृपादृष्टी का, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.   

टॅग्स :बीसीसीआयमीटू