Join us

#MeToo: भारतीय क्रिकेटलाही आता 'मीटू'ची लागण

बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्यावर एका महिलेने लैंगिग छळाचा आरोप केला आहे. या साऱ्या प्रकरणामुळे बीसीसीआयच्या नावाला बट्टा लागला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 15:43 IST

Open in App
ठळक मुद्देमीटू मोहिमेने बॉलिवूडमध्ये जोर आहे. पण हे वादळ आता भारतातील क्रिकेटमध्येही येऊन धडकले आहे.

मुंबई : मीटू मोहिमेने बॉलिवूडमध्ये जोर आहे. पण हे वादळ आता भारतातील क्रिकेटमध्येही येऊन धडकले आहे. कारण बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्यावर एका महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. या साऱ्या प्रकरणामुळे बीसीसीआयच्या नावाला बट्टा लागला आहे.

काही दिवसांपूर्वी एका महिलेने बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. पण याबाबत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. पण आता एका महिला पत्रकाराने जोहरी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

 

बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने जोहरी यांनी आपली बाजू मांडण्यासाठी एका आठवड्याची मुदत दिली आहे.

 

टॅग्स :मीटूबीसीसीआय