आलिया भट्टने विराट कोहलीला दिला 'हा' संदेश

आलियाने कोहलीला जे म्हटले आहे त्यावरून लोकं तिला ट्रोल करत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 18:34 IST2019-02-17T18:33:55+5:302019-02-17T18:34:54+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
A message from Alia Bhatt to Virat Kohli | आलिया भट्टने विराट कोहलीला दिला 'हा' संदेश

आलिया भट्टने विराट कोहलीला दिला 'हा' संदेश

नवी दिल्ली : बॉलीवूडची अभिनेत्री आलिया भट्ट आणि भारताचा कर्णधार विराट कोहली या दोघांमध्ये एक गोष्ट साम्य आहे. हे दोघेही सोशल मीडियामध्ये चर्चेचा विषय असतात. त्याचबरोबर या दोघांचे फोटो किंवा कमेंट चांगलीच वायरल होत असते. आता तर आलियाने विराटला एक प्रेमपूर्ण संदेश दिला आहे. तिच्या या संदेशावर सोशल मीडियामधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

सध्याच्या घडीला आलिया गली बॉय या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्थ आहे. पण या सिनेमाबद्दल बोलताना आलियाने कोहलीला एक प्रेमपूर्ण संदेशही दिला आहे. आलियाने या संदेशामध्ये कोहलीची स्तुती केली आहे. कोहलीने बरेच विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्याचे बरेच चाहते आहे. भारतीय क्रिकेटसाठी कोहलीने जे कार्य केले आहे त्यासाठी त्याचे आभार मानायला हवेत, असे आलियाने या संदेशामध्ये म्हटले आहे. पण यानंतर जे काही आलियाने म्हटले आहे त्यावरून लोकं तिला ट्रोल करत आहेत.

सेलिब्रेटींना खासगी आयुष्य असावे की नसावे, हा वादाचा विषय आहे. काही जणांना सेलिब्रेटींना खासगी आयुष्य नसावे, असे वाटते. तर काही जणांना सेलिब्रेटी हे देखील माणूस आहेत त्यामुळे त्यांना खासगी आयुष्य असावे, असे वाटते. कारण आलियाने कोहलीच्या खासगी गोष्टीबाबत वक्तव्य केले आहे आणि त्यामुळेच ती ट्रोल होत आहे.

आलिया कोहलीला म्हणाली की, " विराट तुझी आणि पत्ीन अनुष्का यांची जोडी सुपरहीट आहे. तुमच्या दोघांचे फोटो सोळ मीडियावर आले की ते चांगलेच वायरव होतात. तुम्हा दोघांनाही लोकं पसंत करतात. तुमच्या दोघांचाही एक चाहता वर्ग आहे. त्यामुळे तो वर्ग तुमच्यावर प्रेम करत असतो. तुमची जोडी अशीच कायम राहो आणि त्याला कुणाचीही नजर लागू नये."

सध्याच्या घडीला विराट विश्रांती करत आहेत. न्यूझीलंडमधील ट्वेन्टी-20 मालिकेसाठी विराटला विश्रांती देण्यात आली होती. आता ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यामध्ये एकदिवसीय आणि ट्वेन्टी-20 सामन्यांच्या मालिका खेळवण्यात येणार आहेत.

 

Web Title: A message from Alia Bhatt to Virat Kohli