Join us
Daily Top 2Weekly Top 5

अर्थ समिती ‘कळसूत्री बाहुली’ तर नाही ना..ज्योतिरादित्य शिंदे यांचा सवाल

बीसीसीआयच्या अर्थ समितीला निर्णय घेण्याचे अधिकार आहेत की नाही? समिती स्वतंत्र निर्णय घेऊ शकते का? आमचे धोरणात्मक निर्णय प्रशासकांच्या समितीने (सीओए) फेटाळले तर..? असे प्रश्न उपस्थित करून समितिप्रमुख ज्योतिरादित्य शिंदे यांनी गुरुवारी बैठकीतून मध्येच बहिर्गमन केले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:56 IST

Open in App

नवी दिल्ली : बीसीसीआयच्या अर्थ समितीला निर्णय घेण्याचे अधिकार आहेत की नाही? समिती स्वतंत्र निर्णय घेऊ शकते का? आमचे धोरणात्मक निर्णय प्रशासकांच्या समितीने (सीओए) फेटाळले तर..? असे प्रश्न उपस्थित करून समितिप्रमुख ज्योतिरादित्य शिंदे यांनी गुरुवारी बैठकीतून मध्येच बहिर्गमन केले.भारतीय एलिट महिला खेळाडूंना अर्थ समितीच्या निर्णयाचा मोठा लाभ होईल. सामन्यांचे मानधन वाढेलच; शिवाय करारातील ग्रेडनुसार मिळणाºया रकमेत वाढ होणार आहे. रणजी खेळाडूंची मॅच फीदेखील वाढविण्याचा समितीचा विचार आहे. सध्या एका सामन्यासाठी खेळाडूला ४० हजार रुपये दिले जातात.बैठकीला उपस्थित राहिलेल्या एका ज्येष्ठ बीसीसीआय अधिकाºयाने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले, की सीईओ राहुल जोहरी तसेच मुख्य वित्त अधिकारी संतोष रांगणेकर यांना चेअरमन तसेच सर्व सदस्यांनी समितीच्या अधिकाराबाबत विचारणा केली. या बैठकीत सीईओ हे सीओएचे प्रतिनिधी असून, समिती स्वतंत्र निर्णय घेऊ शकते की केवळ कळसूत्री बाहुली आहे, हे जोहरी यांनी स्पष्ट करावे, अशी विचारणा शिंदे यांनी केली. यावर जोहरी समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही.समितीने विचारलेला प्रश्न योग्यच होता. समजा समितीने घेतलेला धोरणात्मक निर्णय सीओएने फेटाळला तर समितीला ‘अर्थ’ राहणार नाही. समितीची भूमिका आणि कार्यक्षेत्र निश्चित होण्याची गरज आहे. स्पष्टतेशिवाय समिती पैशाच्या व्यवहाराबाबत देवाण-घेवाण करू शकत नाही, असे या अधिका-याचे मत होते. १६ सप्टेंबर रोजी दिल्लीत होणा-या बैठकीत सीओए अर्थ समितीची भूमिका आणि कार्यकक्षा निश्चित करेल, अशी अपेक्षा आहे. (वृत्तसंस्था)समितीने महिला क्रिकेटपटूंच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असून, आमच्या निर्णयाला काही महत्त्व आहे की नाही, याबद्दल सीओएकडून स्पष्टीकरण मागितले आहे. अर्थ समितीची भूमिका आणि कार्यक्षेत्र यांचा नियमांत स्पष्ट अंतर्भाव नसल्याचे सांगून शिंदे बैठक सोडून मध्येच निघून गेले. 

टॅग्स :बीसीसीआयक्रिकेटभारतीय क्रिकेट संघ