यंदाच्या सत्रापासून एमसीएच्या प्रशिक्षकांना मिळणार बोनस

मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) त्यांच्या वरिष्ठ संघासह अन्य संघांच्या प्रशिक्षकांसाठी अर्ज मागितले आहेत. प्रतिष्ठित रणजी ट्रॉफी जिंकल्यानंतर प्रशिक्षकाला १२ लाख रुपये बोनस रक्कम देण्याच्या तरतुदीचा त्यात समावेश आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 02:53 IST2019-05-11T02:53:22+5:302019-05-11T02:53:42+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
MCA's trainers get bonuses from this session | यंदाच्या सत्रापासून एमसीएच्या प्रशिक्षकांना मिळणार बोनस

यंदाच्या सत्रापासून एमसीएच्या प्रशिक्षकांना मिळणार बोनस

मुंबई : मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) त्यांच्या वरिष्ठ संघासह अन्य संघांच्या प्रशिक्षकांसाठी अर्ज मागितले आहेत. प्रतिष्ठित रणजी ट्रॉफी जिंकल्यानंतर प्रशिक्षकाला १२ लाख रुपये बोनस रक्कम देण्याच्या तरतुदीचा त्यात समावेश आहे.

एमसीएच्या संकेतस्थळानुसार सिनिअर संघाच्या प्रशिक्षकाला २४ लाख रुपये मानधन मिळणार आहे. त्याचा करार एका वर्षासाठी असेल. संघाने रणजी ट्रॉफी जिंकल्यास प्रशिक्षकाला १२ लाख रुपये व उपविजेता ठरल्यास ६ लाख रुपये बोनस दिला जाणार आहे.

एमसीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले की, ‘संघटनेतर्फे प्रशिक्षकाला देण्यात येणारे मानधन आणि बोनसची रक्कम सार्वजनिक करण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही बाब पारदर्शकता ठेवण्यासाठी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे २३ वर्षांखालील संघाच्या प्रशिक्षकास १५ रुपये मानधन आणि याशिवाय कर्नल सी.के. नायडू ट्रॉफी जिंकल्यास ७ लाख, तर उपविजेता ठरल्यास साडेतीन लाख रुपये बोनसच्या रूपात दिले जाणार आहेत.’ एमसीएने याशिवाय १९ व १६ वर्षांखालील संघाच्या प्रशिक्षकपदासाठीदेखील अर्ज मागवले आहेत आणि त्यातही अशाच प्रकारच्या बोनसची तरतूद ठेवण्यात आली आहे.
या पदांसाठी इच्छुक उमेदवारांना १३ मेआधी अर्ज करावा लागणार आहे. एमसीएची क्रिकेट विकास समिती (सीआयसी) ही मुलाखतींसाठी उमेदवारांची छाटणी करील. भारतीय संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या अध्यक्षतेखालील सीआयसीत माजी वेगवान गोलंदाज राजू कुलकर्णी आणि मुंबईचा फिरकी गोलंदाज किरण मोकाशी यांचा समावेश आहे.

Web Title: MCA's trainers get bonuses from this session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई