Join us

एमसीएने थकविला १२० कोटींचा महसूल

थकबाकीच्या वसुलीसाठी एमसीएला नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 02:44 IST

Open in App

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) राज्य सरकारचा १२० कोटी १६ लाख १७ हजार रुपयांचा कर थकविला आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी एमसीएला शासनाने नोटीस बजावली असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.मुंबईतील वानखेडे स्टेडिअमसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला राज्य सरकारने ५० वर्षांच्या भाडे कराराने दिलेल्या जागेची मुदत मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात संपली होती. करार नूतनीकरण, थकित कर व अनधिकृत बांधकामाबाबत मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाने नोटीस बजावली आहे.या संदर्भात काँग्रेसचे अस्लम शेख, अमिन पटेल, शिवसेनेचे अजय चौधरी आदींनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना पाटील यांनी स्पष्ट केले की ५ फेब्रुवारी २०१८ रोजी भाडेपट्टा करार संपुष्टात आला आहे. भाडेपट्ट्याच्या नूतनीकरणासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला पत्र पाठवले आहे. मात्र त्यासाठी थकीत रक्कम भरणे आवश्यक असून ती १२० कोटी १६ लाख १७ हजार रुपये असल्याने नोटीसमध्ये नमूद केले आहे.