Join us  

द्विशतकानंतर मयांक अगरवालला लागू शकते मोठी लॉटरी

या द्विशतकानंतर मयांकला आता मोठी लॉटरी लागू शकते, असे म्हटले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 7:20 PM

Open in App

मुंबई : भारत विरुद्ध बांगालादेश यांच्यामध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात मयांक अगरवालने द्विशतक झळकावत सर्वांचीच मनं जिंकली. मयांकच्या द्विशतकाच्या जोरावर भारताला बांगलादेशवर सहज विजय मिळवता आला. या द्विशतकानंतर मयांकला आता मोठी लॉटरी लागू शकते, असे म्हटले जात आहे.

भारताने इंदूर येथे झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मोठा विजय मिळवला. भारताने बांगलादेशला तब्बल एक डाव आणि १३० धावांनी पराभूत केले. या विजयासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

मयांकने फक्त द्विशतक झळकावले नाही, तर त्याची खेळी चांगलीच आक्रमकही होती. द्विशतक झळकावताना मयांकने षटकार लगावला होता. त्यावेळी काही जणांना वीरेंद्र सेहवागचीही आठवण आली. त्यामुळे आता सेहसागसारखीच भूमिका मयांकला मिळू शकते, असे म्हटले जात आहे.

मयांक सध्या भारताच्या कसोटी संघातच आहे. पण त्याच्या फलंदाजीतील आक्रमकपणा पाहून त्याला भारताच्या एकदिवसीय संघाची मोठी लॉटरी लागू शकते, असे म्हटले जात आहे. त्यामुळे मयांकला जर एकदिवसीय संघात स्थान द्यायचे झाले, तर कोणत्या खेळाडूला बाहेर काढायचे, याचा विचारही संघ व्यवस्थापनेला करावा लागणार आहे.

शमी आणि मयांकची क्रमवारीत झेप; पटकावले मानाचे स्थानभारत विरुद्ध बांगालादेश यांच्यामध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात मयांक अगरवाल आणि मोहम्मद शमी यांनी नेत्रदीपक कामगिरी केली. या कागिरीचा फायदा या दोघांनाही आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत झालेला पाहायला मिळाला.

मयांककने या सामन्यात द्विशतकी खेळी साकारली, तर शमीने सामन्यात सात विकेट्स मिळवल्या. या कामगिरीच्या जोरावर या दोघांनी आयसीसीच्या क्रमवारीत झेप घेतली आहे. शमीने तर माजी कर्णधार कपिल देव आणि जसप्रीत बुमरा यांच्यानंतर मानाचे स्थान पटकावले आहे.

कसोटी सामन्यात २४३ धावांची खेळी साकारत मयांकने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या कामगिरीमुळे मयांकने आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत अकरावे स्थान पटकावले आहे. या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा माी कर्णधार स्टीव्हन स्मिथ अव्वल स्थानावर आहे, तर दुसरे स्थान भारताचा कर्णधार कोहलीने पटकावले आहे.

आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीमध्ये शमीने सातवे स्थान पटकावले आहे. कपिल देव आणि बुमरा यांच्यानंतर शमी हा हे स्थान पटकावणारा भारताचा तिसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे.

टॅग्स :मयांक अग्रवालभारत विरुद्ध बांगलादेशविरेंद्र सेहवाग