Join us

Mayank Agarwal, IPL 2022 DC vs PBKS Live: अरेरे... असा क्लीन बोल्ड कधी पाहिलाय? आऊट झाल्यावर मयंकही झाला निराश (Video)

पंजाबचा डाव ११५ धावांवर आटोपला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 21:15 IST

Open in App

Mayank Agarwal, IPL 2022 DC vs PBKS: IPL बायो बबलमध्ये कोरोनाचा प्रवेश झाल्यामुळे दिल्ली आणि पंजाब यांच्यातील सामना होणार की नाही, अशी शंका व्यक्त केली जात होती. पण अखेर दिल्लीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पंजाबच्या डावाची सुरूवात अतिशय खराब झाली. सलामीवीर शिखर धवन वेगवान खेळी करण्याच्या प्रयत्नात वाईडचा चेंडू मारताना ९ धावांवर बाद झाला. पण मयंक अग्रवालने दमदार खेळी करण्याचा धडाका सुरू ठेवला होता. त्याने पहिल्या दोन षटकात चार चौकारांच्या साथीने धावसंख्येची विशी गाठली. पण तो कमनशिबी निघाला.

मुस्तफिजूर रहमानच्या गोलंदाजीवर एका आखूड टप्प्याच्या चेंडूला टोलवताना तो बाद झाला. चेंडू अपेक्षेपेक्षा शरीराच्या जास्तच जवळ आला आणि स्विंग झाला. त्यामुळे त्याला चेंडूचा अंदाज आला नाही. त्याचा फटका त्याला बसला. चेंडूत आत वळून बॅटला लागला आणि थेट स्टंपवर जाऊन आदळला. मयंक अग्रवालने १५ चेंडूत २४ धावा काढल्या. पाहा त्याची विकेट-

मयंक बाद झाल्यावर पंजाबचा डाव सावरणं कोणालाही जमलं नाही. जॉनी बेअरस्टो (९), लियम लिव्हिंगस्टोन (२), शाहरूख खान (१२) हे तिघेही चांगल्या लयीत असूनही स्वस्तात बाद झाले. जितेश शर्माने ५ चौकारांसह चांगली झुंज दिली होती. पण २३ चेंडूत ३२ धावा काढून तो देखील बाद झाला. त्यानंतर कगिसो रबाडा (२), नॅथन एलिस (०) हे खेळाडू झटपट माघारी परतले. तळाच्या फळीत राहुल चहर (१२), आर्शदीप सिंग (९) आणि वैभव अरोरा (२*) यांनी संघाला ११५ धावांपर्यंत मजल मारून दिली.

टॅग्स :आयपीएल २०२२मयांक अग्रवालपंजाब किंग्सदिल्ली कॅपिटल्स
Open in App