Join us

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहला शुभेच्छा देताना मयांक अग्रवालनं केली चूक अन् व्हायरल झाला संजय बांगरचा फोटो

Mayank Agarwal मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, युवराज सिंग, हार्दिक पांड्या, सचिन तेंडुलकर या सर्वांना नव दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 15:33 IST

Open in App

भारतीय संघाचा आणि मुंबई इंडियन्सचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) यानं सोमवारी स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेशन ( Sanjana Ganesan) हिच्याशी लग्न केलं. या दोघांनी आपापल्या सोशल अकाऊंटवरून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आणि त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.''आम्ही नव्या प्रवासाला एकत्र सुरुवात करत आहोत. आज आमच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण आहे,''अशी पोस्ट बुमराहनं सोशल मीडियावर लिहिली. Jasprit Bumrah Weds Sanjana Ganesan : जसप्रीत बुमराह- संजना गणेशन यांच्या लग्नाचे Unseen फोटो अन् Video

मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, युवराज सिंग, हार्दिक पांड्या, सचिन तेंडुलकर या सर्वांना नव दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. त्यात मयांक अग्रवाल ( Mayank Agarwal) यानं दिलेल्या शुभेच्छांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली. मयांकनं जसप्रीत व संजना यांना शुभेच्छा देताना भारतीय संघाचे माजी सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर ( Sanjay Bangar)  यांना चुकून टॅग केलं. चूक लक्षात येताच त्यानं ती सुधरली, परंतु तो पर्यंत सोशल मीडियावर त्याचं ट्रोलींग सुरू झालं होतं. भारत-इंग्लंड सामने थांबवा, अन्यथा आत्महत्या करीन; नरेंद्र मोदी स्टेडियमच्या सुरक्षा अधिकाऱ्याला आला फोन अन्...

क्रीडा विश्वातून शुभेच्छांचा वर्षाव...

 

टॅग्स :जसप्रित बुमराहमयांक अग्रवालसंजना गणेशन